नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे २५.४१ टक्केच वाटप

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन पध्दतीने बॅंकांकडे पीककर्जाची मागणी केली आहे.
Distribution of crop loan in Nanded district is only 25.41 percent
Distribution of crop loan in Nanded district is only 25.41 percent

नांदेड :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार  शेतकऱ्यांनी ऑनलाइन पध्दतीने बॅंकांकडे पीककर्जाची मागणी केली आहे. सोमवार (ता.१७) पर्यंत सार्वजिनक, खाजगी, सहकारी, ग्रामीण क्षेत्रातील बॅंकांनी ८७ हजार ५६३ शेतकऱ्यांना ५१६ कोटी १८ लाख ७१ हजार रुपये (२५.४१ टक्के) पीक कर्जवाटप केले.

गेल्या आठवडाभरात ७ हजार २९६ शेतकऱ्यांना १०५ कोटी ५१ लाख ३६ हजार रुपये एवढे पीककर्ज कर्ज वाटप करण्यात आले. ऑनलाईन मागणी अर्ज केलेल्यांपैकी १ लाख ८० हजार ४३७ शेतकरी कर्ज मिळण्याची वाट बघत आहेत.

शेतकऱ्यांकडे पीककर्जासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करु नये, या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशास बॅंका केराची टोपली दाखवत आहेत. कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी तलाठी, अन्य बॅंकांमध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. बॅंकांच्या कार्यप्रणालीबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यापारी आणि खाजगी बॅंकांनी १० टक्के देखील पीक कर्जवाटप केलेले नाही. 

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ४० टक्केचा टप्पा पार केला आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टपुर्ती केल्यानंतरही पीक कर्जवाटप सुरु ठेवले आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सार्वजिनक क्षेत्रातील, सहकारी तसेच खाजगी बॅंकांना एकूण २ हजार ३१ कोटी ६७ लाख ७० हजार रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यात जिल्हा बॅंकेला १८५ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १ हजार ५५७ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २८८ कोटी २५ लाख ५० हजार रुपये एवढ्या उद्दिष्टाचा समावेश आहे.

सोमवार (ता.१७) अखेर जिल्हा बॅंकेने ५५ हजार १७५ शेतकऱ्यांना २६० कोटी ९१ लाख ९८  हजार रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या १४०.४७ टक्के पीक कर्जवाटप केले. व्यापारी आणि खाजगी बॅंकांनी १३ हजार ८१८ शेतकऱ्यांना १३५ कोटी ९२ लाख ६९ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १८ हजार ५७० शेतकऱ्यांना ११९  कोटी ३४ लाख ४ हजार रुपये  पीक कर्जवाटप केले.

जुन्या शेतकऱ्यांकडे पीककर्जासाठी अनावश्यक कागदपत्राची मागणी करु नये, असे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश असताना अनेक बॅंकातील व्यवस्थापक रिजर्व्ह बॅंकेचे तसे आदेश नसल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. पीककर्जमंजुरीसाठी चालढकल करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामे सोडून कित्येक दिवसांपासून बॅंकांच्या शाखेत हेलपाटे मारावे लागत आहे.

पीककर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे  न घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बॅंका धुडकाऊन लावत आहेत. नवीन नियमम सांगत आहेत. एसबीआयच्या शाखेत आठवडभरात कित्येक हेलपाटे मारुनही अद्याप पीककर्ज मिळालेले नाही. - जितेंद्र उपलेंचवार, अंजनखेड, ता. माहूर, जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com