agriculture news in marathi Distribution of crop loan only 31% in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात ३१ टक्केच पीककर्जाचे वाटप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

परभणी ः या वर्षीच्या (२०२१) खरीप हंगामात जिल्हा बॅंकेने पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती केली आहे. परंतु राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खासगी बॅंकांचे पीक कर्जवाटप अडखळत सुरु आहे.

परभणी ः या वर्षीच्या (२०२१) खरीप हंगामात जिल्हा बॅंकेने पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती केली आहे. परंतु राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खासगी बॅंकांचे पीक कर्जवाटप अडखळत सुरु आहे. शनिवार (ता.१७) पर्यंत सर्व बॅंकांनी मिळून एकूण ६५ हजार ५९१ शेतकऱ्यांना ३७६ कोटी २१ लाख रुपये (३१.०१ टक्के) पीक 
कर्जवाटप केले. आजवरच्या वाटपात ६ हजार ६५ शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज दिले. तर, ५९ हजार ५२६ शेतकऱ्यांनी पीककर्जाचे नूतनीकरण केले.

जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण, सहकारी, खासगी क्षेत्रातील एकूण १७ बॅंकांना चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार २१३ कोटी २२ लाख रुपये पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक आहे. त्यात राष्ट्रीयकृत बॅंकांना ७८१  कोटी ५८ लाख रुपये, खासगी बॅंकांना १०१ कोटी १८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १८७ कोटी ६३ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला १४२  कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जवाटपाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे.

सर्वाधिक उद्दिष्टाच्या राष्ट्रीयकृत (वाणिज्यक) बॅंकांनी आजवर ११  हजार ७५२ शेतकऱ्यांना ११८ कोटी ७८ लाख रुपये (१५.२० टक्के), खासगी बॅंकांनी १ हजार ३५५ शेतकऱ्यांना १६ कोटी २० लाख रुपये (१६.०१ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १० हजार ४३९ शेतकऱ्यांना ८९ कोटी ६४ लाख रुपये (४७.७७ टक्के), जिल्हा बॅंकेने ४२ हजार ४५ शेतकऱ्यांना १५१ कोटी ५९ लाख रुपये (१०६.१३ टक्के) पीक कर्जवाटप केले. सर्व बॅंकांनी मिळून आजवर ६ हजार ६५ शेतकऱ्यांना ६२ कोटी ३५ लाख रुपयाचे नवीन पीक कर्जवाटप केले. एकूण ५९ हजार ५२६ शेतकऱ्यांनी ३१३ कोटी ८६ लाख रुपयांच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...