agriculture news in marathi Distribution of crop loan of Rs. 2,300 crore for kharif in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी २३०० कोटींचे पीक कर्जवाटप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 मार्च 2021

नाशिक : ‘‘चालू आर्थिक वर्षात २०२०-२१ खरीप पिकांसाठी २ हजार ३०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. गेल्या वर्षापेक्षा २०१९-२० पेक्षा ९५९ कोटी रुपयांनी जास्तीचे आहे. गत चार वर्षातील खरीप पीक कर्जवाटपाचा उच्चांक आहे.’`

नाशिक : ‘‘चालू आर्थिक वर्षात २०२०-२१ खरीप पिकांसाठी २ हजार ३०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. गेल्या वर्षापेक्षा २०१९-२० पेक्षा ९५९ कोटी रुपयांनी जास्तीचे आहे. गत चार वर्षातील खरीप पीक कर्जवाटपाचा उच्चांक आहे’’, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

पतपुरवठा योजनेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता.१५) बॅंकर्सची बैठक झाली. यावेळी मांढरे बोलत होते. अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अर्धेंदू शेखर, एसबीआय बॅंकेचे क्षेत्रीय सहायक महाप्रबंधक सफल त्रिपाठी, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे,जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे आदी उपस्थित होते. 

मांढरे म्हणाले, ‘‘बॅंकांनी एक वास्तववादी लक्ष्य निश्चित करावे. त्यातून जिल्ह्याची पीक कर्जाची आवश्यकता, बँकांना दिलेल्या उद्दिष्ट निश्‍चित होईल. येणाऱ्या आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी ते प्रभावी ठरेल. उद्दिष्ट हे शाखांची संख्या, प्रसार आणि गतिशीलता, लागवडीखालील जमीन आणि पिकाच्या उत्पादनास चालना देणारे व शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी प्रेरित 
करणारे असावे.’’ 

९५९ कोटींचे अधिक वाटप 

मागील ४ वर्षांचा शेती कर्जांचा आढावा घेतला असता २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ९५९  कोटी रुपयांनी अधिक पीक कर्जवाटप झाले. जिल्ह्यात पीक कर्जवाटपात वाढ झाली. शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेवर करून किंवा नूतनीकरण करून व्याज परताव्याचा लाभ घ्यावा. ज्यामुळे जिल्ह्यातील पतपुरवठ्यास चालना मिळेल. जिल्ह्यातील शेती उद्योगातील प्रगतीत सर्वसमावेशक वाढ होईल, असे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...