नांदेड जिल्ह्यात ६१ हजारांवर शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप

नांदेड जिल्ह्यात ६१ हजारांवर शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप
नांदेड जिल्ह्यात ६१ हजारांवर शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप

नांदेड : यंदाच्या खरिपात सोमवारपर्यंत (ता. २२) जिल्ह्यातील ६१ हजार ४७ शेतकऱ्यांना ३५७ कोटी ८४ लाख (१८.१९ टक्के) रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकाचे कर्जवाटप संथ गतीने सुरू आहे. जिल्हा बॅंकेने मात्र उद्दिष्टापेक्षा जास्त पीककर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यात १ हजार ९६७ कोटी ५१ हजार रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी १ हजार ३६० कोटी ७ लाख उद्दिष्टापैकी ५ हजार ५४० शेतकऱ्यांना ६४ कोटी ८७ लाख रुपयांचे (४.७७ टक्के) कर्जवाटप केले.

खासगी क्षेत्रातील बॅंकाना १५१ कोटी ६७ लाख रुपये उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३ हजार ३४३ शेतकऱ्यांना ६१ कोटी ६९ लाख रुपये (४०.६७ टक्के) पीककर्ज वाटप झाले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २७७ कोटी १७ लाख उद्दिष्टापैकी ६ हजार ४७७ शेतकऱ्यांना ४७ कोटी २९ लाख रुपयांचे (१७.०६ टक्के) वाटप केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १७८ कोटी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ४५ हजार ६८७ शेतकऱ्यांना १८३ कोटी ९९ लाख (१०३.०२ टक्के) वाटप करण्यात आले. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप केले आहे. 

पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)

बॅंक  शेतकरी संख्या पीककर्ज टक्केवारी
राष्ट्रीयीकृत बँका ५५४० ६४.८७  ४.७७
खासगी बॅंका ३३४३  ६१.६९ ४०.६७
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक  ६४७७  ४७.२९ १७.०६
जिल्हा बॅंक ४५६८७ १८३.९९ १०३.०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com