Agriculture news in marathi Distribution of cucumber to three thousand policemen on duty | Agrowon

कर्तव्यावर असलेल्या तीन हजार पोलिसांना काकडीचे वाटप  

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

नाशिक : लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बसला आहे. लाखो रुपयांची निर्यातक्षम शेतमाल अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कष्टाने पिकविलेल्या हा शेतमाल असा फेकताना, सडताना पाहून अनेकांच्या पोटात धस्स होतं. पण अशाही परिस्थितीत निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंदे यांनी तब्बल साडे आठशे किलो निर्यायतक्षम काकडी शेतातून काढून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवस रात्र रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसांसाठी भेट म्हणून दिली आहे. 

नाशिक : लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बसला आहे. लाखो रुपयांची निर्यातक्षम शेतमाल अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कष्टाने पिकविलेल्या हा शेतमाल असा फेकताना, सडताना पाहून अनेकांच्या पोटात धस्स होतं. पण अशाही परिस्थितीत निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंदे यांनी तब्बल साडे आठशे किलो निर्यायतक्षम काकडी शेतातून काढून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवस रात्र रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसांसाठी भेट म्हणून दिली आहे. 

शरीराला लाभदायी ठरणारी काकडी भर उन्हात मिळाल्याने पोलिसांनीही या शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. शेतकऱ्याच्या संकल्पनेचे व औदार्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील कौतुक केले आहे. निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शरद शिंदे हे प्रयोगशील युवा शेतकरी आहेत. देशसेवा करणाऱ्या हातांना आपलेही बळ लाभो या विचाराने शिंदे यांनी सुमारे आठ क्विंटल काकडी शहरातील बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस बांधवांना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वाटप केले आहे. 

लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल नष्ट न करता, फेकून न देता तो लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या निवारागृह, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनहितासाठी दान करावा. 
- शरद शिंदे, प्रयोगशील युवा शेतकरी, खडक माळेगाव, ता. निफाड 
 


इतर बातम्या
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...