Agriculture news in Marathi Distribution of foodgrains to 1.5 lakh saffron ration card holders | Agrowon

दीड लाख केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

सांगली ः केशरी शिधापत्रिका (बिगर प्राधान्य गट) धारकांना जे अन्न सुरक्षा यादी समाविष्ट नाहीत त्यांना शासनाने प्रति व्यक्ती ३ किलो गहू (८ रुपये प्रति किलो दराने) व प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ (१२ रुपये प्रति किलो दराने) धान्य, माहे मे व जून महिन्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. एकूण २ लाख १८ हजार ५३४ केशरी शिधापत्रिकांपैकी १ लाख ५२ हजार १६९ इतक्‍या शिधापत्रिकाधारकांनी धान्याचा लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. 

सांगली ः केशरी शिधापत्रिका (बिगर प्राधान्य गट) धारकांना जे अन्न सुरक्षा यादी समाविष्ट नाहीत त्यांना शासनाने प्रति व्यक्ती ३ किलो गहू (८ रुपये प्रति किलो दराने) व प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ (१२ रुपये प्रति किलो दराने) धान्य, माहे मे व जून महिन्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. एकूण २ लाख १८ हजार ५३४ केशरी शिधापत्रिकांपैकी १ लाख ५२ हजार १६९ इतक्‍या शिधापत्रिकाधारकांनी धान्याचा लाभ घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. 

जिल्हा पुरवठा अधिकारी बारवे म्हणाल्या की, ग्रामीण भागात ६३ ते ८९ टक्‍के व शहरी भागात ५७ ते ६० टक्‍के कार्ड धारकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. अद्याप ६६,३६५ केसरी कार्ड धारकांनी धान्य नेलेले नाही त्यांनी ९ मे पर्यंत धान्य घेऊन जावे. जून महिन्यासाठी २५ मे पासून केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. माहे मे महिन्यासाठी प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी यांचे नियमित धान्य वाटप पॉस मशीनद्वारे ५ मे पासून सुरू झालेले आहे. पहिल्या दोन दिवसांत ९० हजार कार्डधारकांनी धान्याचा लाभ घेतलेला आहे. 

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति कार्ड १ किलो मोफत तूर डाळ किंवा चणाडाळ एप्रिल, मे व जून महिन्यासाठी देणार असल्याचे शासनाने जाहीर केलेले आहे. डाळी प्राप्त होताच त्याचे वाटप मोफत तांदळासोबत करण्यात येणार आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...