Agriculture news in Marathi Distribution of free rice from tomorrow in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात उद्यापासून मोफत तांदूळ वाटप

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

नाशिक : ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत रेशनवर एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. या योजनेतील १८ हजार टन तांदूळ नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. याचे वाटप शुक्रवार १० एप्रिलपासून केले जाणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

नाशिक : ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत रेशनवर एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. या योजनेतील १८ हजार टन तांदूळ नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. याचे वाटप शुक्रवार १० एप्रिलपासून केले जाणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून प्रत्येक पात्र अंत्योदय आणि प्राधान्य रेशनकार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ शुक्रवारपासून मोफत दिले जाणार आहे. हे धान्य एप्रिलसोबतच मे आणि जूनमध्ये सुद्धा त्या-त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.त्याचबरोबर जिल्ह्यासाठी अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी मुबलक स्वरूपात धान्य उपलब्ध असून त्याचे वाटप सुरू आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे एकूण ७ लाख ६३ हजार ३०५ रेशनकार्ड धारक आहेत. या लाभार्थ्यांना २ हजार ६०८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून नाशिक जिल्ह्यातील ३ लाख ७० हजार ५७३ शिधापत्रिका धारकांना तब्बल ९६ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे ६१ हजार ९२५ क्विंटल गहू, ३३ हजार ९९० क्विंटल तांदूळ तर ७६ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. पोर्टबिलीटी 

यंत्रणेअंतर्गत अन्नधान्य
स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे १९ हजार ४२६ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.तसेच मे व जून महिन्यांतील मंजूर धान्य ज्या-त्या महिन्यात वाटप केले जाणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...