वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत भाजीपाला वाटप

अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य म्हणून वाडेगाव येथील रामेश्‍वर शंकर सोनटक्के यांनी आपल्या शेतातील भाजीपाला गावातील नागरिकांना मोफत वितरित केला. कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनात त्यांनी हा उपक्रम राबविला.
Distribution of free vegetables from farmers to the villagers in Wadgaon

कोरोना’मुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या परिस्थितीत सर्व व्यवहार ठप्प झालेले असल्याने ताजा भाजीपालासुद्धा पुरेसा मिळत नाही. शिवाय गावात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या नागरिकांना मदत म्हणून सोनटक्के यांनी आपल्या शेतातील कोबी मोफत वाटपाचा निर्णय घेतला. याला कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने सहकार्य करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता श्री. सोनटक्के व त्यांच्या पत्नी नंदाबाई सोनटक्के तसेच देवकाबाई सोनटक्के यांनीसुद्धा या उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. 

कृषी माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संतोष सरप, गजानन काळे, राजेश सरप, चंदन माणिकराव सरप, अनंता सोनटक्के, केशवराव सरप, सीताराम श्रीनाथ यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. जोपर्यंत हे संकट आहे तोवर विविध शेतकऱ्यांच्या सहकार्यातून हा मोफत भाजीपाला वाटपाचा उपक्रम राबविणार असल्याचे संस्थाध्यक्ष केशवराव सरप यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com