जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री वाहनांचे गटांना वितरण

जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री वाहनांचे गटांना वितरण
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री वाहनांचे गटांना वितरण

बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अत्यल्प व अल्प भूधारक लाभार्थी गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांसाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जळगाव जामोद येथे पाच गटांना फिरत्या मासळी विक्री वाहनांचे वितरण करण्यात आले.  या वेळी सहायक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) स. इ. नायकवडी, अपर्णाताई संजय कुटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सदर फिरते मासळी विक्री वाहन जय भवानी अल्पभूधारक शेतकरी गट (तामगाव ता. संग्रामपूर), फुलाजी माउली आदिवासी महिला बचत गट (टिटवी ता. लोणार), बळिराजा अल्पभूधारक शेतकरी गट (उबाळखेड ता. मोताळा), आदर्श अल्पभूधारक शेतकरी गट पिंपळगाव नाथ (ता. मोताळा), शिवकृपा अल्पभूधारक शेतकरी गट (कुंबेफळ ता. सिंदखेडराजा) या पाच गटांना वितरित करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com