Agriculture news in Marathi Distribution of Rabbi crop Loan by Pune District Bank | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज वाटप सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ५८० कोटी ६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी आर्थिक अडचणी येऊ नये, म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) रब्बी हंगामासाठी एकूण ५८० कोटी ६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. बँकेकडून कर्जवाटपाची प्रकिया सुरू केल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी बँकेने रब्बीसाठी एकूण ५५१ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक कर्जात जवळपास २९ कोटीने वाढ केली आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासाठी फारशा अडचणी येणार नसल्याचे बँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. 

हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन रब्बीचे नियोजन करून पिके घेतात. रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग यासह इतर पिकांना पीक कर्जाचे वाटप करणार आहे. त्यामुळे दरवर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यांत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. 

रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, करडई अशी विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांचे नियोजन करून पिके घेतात. यंदाही पुणे जिल्हा बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या ३०० शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १३०६ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना देतात. सध्या बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत.

तालुकानिहाय पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
आंबेगाव  ५७ कोटी ५५ लाख ९४ हजार रुपये
बारामती   ४५ कोटी २९ लाख ४८ हजार
भोर    १४ कोटी २६ लाख ४३ हजार
दौंड    ७२ कोटी २१ लाख ८३ हजार
हवेली    १२ कोटी ८३ लाख ६७ हजार
इंदापूर  १४३ कोटी ४८ लाख ४६ हजार
जुन्नर   ५८ कोटी १६ लाख ४२ हजार
खेड    ५४ कोटी ७३ लाख ८८ हजार
मावळ   २० कोटी २ लाख ५९ हजार
मुळशी   १६ कोटी ४५ लाख ६२ हजार
पुरंदर   १८ कोटी ९८ लाख १५ हजार
शिरूर   ६१ कोटी ९० लाख १० हजार
वेल्हा   ४ कोटी १३ लाख ४३ हजार
एकूण  ५८० कोटी ६ लाख रुपये

 


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...