परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरण

चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील बॅंकांनी ७३ हजार ५५४ शेतकऱ्यांना ४४६ कोटी ५९ लाख रुपये (३६.८१ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप केले आहे.
Distribution of Rs. 446 crore 59 lakhs in Parbhani
Distribution of Rs. 446 crore 59 lakhs in Parbhani

परभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील बॅंकांनी ७३ हजार ५५४ शेतकऱ्यांना ४४६ कोटी ५९ लाख  रुपये (३६.८१ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांचे पीककर्ज वाटपाला अजूनही गती प्राप्त झालेली नाही.

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, सहकारी, खासगी क्षेत्रातील एकूण १७ बॅंकांना चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार २१३ कोटी २२ लाख रुपये पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांना ७८१  कोटी ५८ लाख रुपये, खासगी बॅंकांना १०१ कोटी १८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १८७ कोटी ६३ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १४२ कोटी ८३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टांचा समावेश आहे. राष्ट्रीयीकृत (वाणिज्यिक) बॅंकांनी आजवर १५ हजार ६१६ शेतकऱ्यांना १५६ कोटी ८० लाख रुपये (२०.०६ टक्के), खासगी बॅंकांनी १ हजार ४७० शेतकऱ्यांना १७ कोटी २६ लाख रुपये (१७.०६ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १४ हजार ११५ शेतकऱ्यांना १२० कोटी २७ लाख रुपये (६४.१० टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ४२ हजार ३५३ शेतकऱ्यांना १५२ कोटी २६ लाख रुपये (१०६.६०३ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. 

सर्व बॅंकांनी मिळून आजवर १० हजार १८३ शेतकऱ्यांना १०१ कोटी ३३ लाख रुपये एवढे नवीन पीककर्ज वाटप केले आहे. तर एकूण ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांनी ३४५ कोटी २६ लाख रुपयाच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप केले असले तरी एकाही नवीन शेतकऱ्यांस कर्ज दिलेले दिसत नाही. गतवर्षी (२०२०) जुलै अखेर ७१ हजार ३८९ शेतकऱ्यांना ४६८ कोटी ९१ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटप करण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com