Agriculture news in Marathi Distribution of Rs. 446 crore 59 lakhs in Parbhani | Page 2 ||| Agrowon

परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरण

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील बॅंकांनी ७३ हजार ५५४ शेतकऱ्यांना ४४६ कोटी ५९ लाख  रुपये (३६.८१ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप केले आहे.

परभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील बॅंकांनी ७३ हजार ५५४ शेतकऱ्यांना ४४६ कोटी ५९ लाख  रुपये (३६.८१ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांचे पीककर्ज वाटपाला अजूनही गती प्राप्त झालेली नाही.

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, सहकारी, खासगी क्षेत्रातील एकूण १७ बॅंकांना चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार २१३ कोटी २२ लाख रुपये पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांना ७८१  कोटी ५८ लाख रुपये, खासगी बॅंकांना १०१ कोटी १८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १८७ कोटी ६३ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १४२ कोटी ८३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टांचा समावेश आहे.

राष्ट्रीयीकृत (वाणिज्यिक) बॅंकांनी आजवर १५ हजार ६१६ शेतकऱ्यांना १५६ कोटी ८० लाख रुपये (२०.०६ टक्के), खासगी बॅंकांनी १ हजार ४७० शेतकऱ्यांना १७ कोटी २६ लाख रुपये (१७.०६ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १४ हजार ११५ शेतकऱ्यांना १२० कोटी २७ लाख रुपये (६४.१० टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ४२ हजार ३५३ शेतकऱ्यांना १५२ कोटी २६ लाख रुपये (१०६.६०३ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. 

सर्व बॅंकांनी मिळून आजवर १० हजार १८३ शेतकऱ्यांना १०१ कोटी ३३ लाख रुपये एवढे नवीन पीककर्ज वाटप केले आहे. तर एकूण ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांनी ३४५ कोटी २६ लाख रुपयाच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप केले असले तरी एकाही नवीन शेतकऱ्यांस कर्ज दिलेले दिसत नाही. गतवर्षी (२०२०) जुलै अखेर ७१ हजार ३८९ शेतकऱ्यांना ४६८ कोटी ९१ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटप करण्यात आले होते.


इतर बातम्या
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ...नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने...
सोयाबीनचे दर दबावाखाली;  ‘स्वाभिमीनी’चे...परभणी : सोयाबीनचे दर कोसळविणाऱ्या राज्य व केंद्र...
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको :...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे...
‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे...नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू...
अकोला :सोयाबीन, कापूस उत्पादक  सततच्या...अकोला : सोयाबीन काढणीला तयार होत असतानाच पावसाची...
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना...नाशिक : ‘नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून...
इंधवे येथील पाझर तलावाची दुरुस्ती होईनापारोळा, जि. जळगाव : इंधवे (ता. पारोळा) येथील पाझर...
पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन... पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात...
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...