देवळा तालुक्यात शिवरस्त्यांची दुरवस्था

देवळा तालुक्यात  शिवरस्त्यांची दुरवस्था
देवळा तालुक्यात शिवरस्त्यांची दुरवस्था

नाशिक ः सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शिवनाल्याला पाणी आल्याने सदर नाल्यात पाण्याच्या प्रवाहाने सुमारे पाच फूट खोली निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यापासून बंद असलेला भऊर-विठेवाडी जवळचा ४०० मीटरचा शिवरस्ता बंद झाला आहे. त्यामुळे येथील नागरिक व शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळित झाले असून  अडचणी येत आहे.  अखेर या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने लोकवर्गणीतून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा शिवरस्ता हा अतिशय उपयुक्त असून विडेवाडी सावकी दरम्यान असलेल्या बिटिशकालीन बंधारा असून विठेवाडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या बंधाऱ्यालगत असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युतपंप सुरू करण्यासाठी सुमारे दीड किलो मीटर पायी जावे लागते, या संदर्भात लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com