सोडियम हाइपोक्लोराइटचे शासकीय कार्यालयांना वितरण 

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध पातळीवरून सातत्याने प्रयत्न होत आहेत. ज्यामध्ये मास्क, सॅनिटायझर व पीपीइ किट्स सोबतच सोडिअम हाइपोक्लोराइटची फवारणी परिसर निर्जंतुकीकरणासाठी करण्यात येत आहे. मात्र शासकीय पातळीवरून या औषधांची उपलब्धता ग्रामीण भागात होताना दिसत नाही. हीच बाब ओळखून कृषी उद्योजक डॉ. जगताप यांनी सामाजिक जबाबदारीतून ‘कृषिदूत’ बायो हर्बल’ या त्यांच्या कंपनीच्या मार्फत ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस स्टेशन, बाजार समिती, विद्युत विभाग कार्यालय, नगरपालिका, तहसीलदार, प्रांत, कृषी विभाग व बॅंका आदी जनतेच्या वर्दळीच्या ठिकाणी सोडिअम हाइपोक्लोराइट या औषधाची विनामूल्य वितरण केले.
Distribution of sodium hypochlorite to government offices

जिल्ह्यात लासलगाव (ता. निफाड) परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. याच धर्तीवर ग्रामीण भागातही खबरदारी घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमासाठी अंदाजे २ लाखांची तरतूद स्वखर्चातून केली आहे. त्यानुसार चांदवड, निफाड, दिंडोरी व नाशिक तालुक्यात वितरण केले. गावाच्या भौगोलिक आकारमानानुसार ५ ते ४० लीटरपर्यंत सोडिअम हाइपोक्लोराइट त्यांनी वाटप केले आहे. 

यासह संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत त्याचे यशस्वी नियोजन केले. चांदवड तालुक्यामध्ये ७५ ग्रामपंचायत, १ नगरपालिका, निफाड तालुक्यामध्ये ७२ ग्रामपंचायत, १ नगरपालिका दिंडोरी तालुक्यामध्ये ५५ ग्रामपंचायत, १ नगरपालिका व १ बाजार समिती तर नाशिक तालुक्यामध्ये १५ ग्रामपंचायत, ७ पोलिस स्टेशन व ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण केले आहे. 

या कामात चांदवड तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, दिंडोरी तालुका कृषी अधिकारी अभिजित जमधडे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, चांदवड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. कदम, निफाडचे गटविकास अधिकारी श्री. कराड यांनीही त्यांना वितरणात मदत केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com