Agriculture news in marathi; Distribution of vegetable kits to flood affected farmers in Bhamragad taluka | Agrowon

भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना भाजीपाला किटचे वितरण

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली व रिपब्लिक महिला ट्रस्ट गडचिरोली यांच्या संयुक्‍त सहकार्याने भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्तांना भाजीपाला बियाण्याचे वितरण करण्यात आले.

गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली व रिपब्लिक महिला ट्रस्ट गडचिरोली यांच्या संयुक्‍त सहकार्याने भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्तांना भाजीपाला बियाण्याचे वितरण करण्यात आले.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे भामरागड तालुक्‍यातील नद्या, नाल्यांना पूर आला होता. या पुरामुळे परिसरातील शेती खरडून जाण्याचे प्रकार घडले. शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले. त्यासोबतच सुपीक मातीदेखील पाण्यासोबत वाहून गेली. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली व रिपब्लिक महिला ट्रस्ट यांच्या वतीने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्याचे वाटप करण्यात आले. पुरामुळे धान पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामात लागवडीकरिता बियाणे तसेच भाजीपाला बियाणे खरेदीसाठी देखील पैसे शिल्लक नव्हते. त्यामुळे परिसरातील शेतकरी रब्बी पीक व भाजीपाला उत्पादनापासून वंचित राहण्याची भीती होती. त्यासोबतच त्यांच्यासमोरील आर्थिक संकट आणखी गडद होणार होते. हे लक्षात घेत बियाणे वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. 

भामरागड तालुक्‍यातील हितापडी, हिदूर, आरेवाडा, फुलणार, जुवी, गुंडूरवाही, कोपर्शी येथील सुमारे ३०० शेतकऱ्यांना भाजीपाला बियाण्यांच्या मिनीकट वितरित करण्यात आला. या वेळी जयंत काऊटकर, वर्षा कुंभरे, कुंदा कुंभरे, अभिजीत कापगते यांची उपस्थिती होती.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...