नगर जिल्ह्यामध्ये ६९ छावण्या प्रत्यक्षात सुरू

नगर जिल्ह्यामध्ये ६९ छावण्या प्रत्यक्षात सुरू
नगर जिल्ह्यामध्ये ६९ छावण्या प्रत्यक्षात सुरू

नगर : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पशुधन वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी १६५ चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. यापैकी ६९ छावण्या सुरू झाल्या असून, त्यात २९ हजार ९४२ जनावरे दाखल झाली आहेत. लहान चार हजार ३१९, तर मोठ्या २५ हजार ६२३ जनावरांच्या चाऱ्यावर प्रशासनाला रोज १९ लाख ४४ हजार ७७५ रुपये खर्च करावा लागत आहे. 

जिल्ह्यात लहान-मोठ्या जनावरांची संख्या २८ लाख आहे. मोठ्या जनावरांची संख्या सतरा लाख आहे. पशुधनाच्या संगोपनासाठी दिलासा मिळावा, म्हणून प्रशासनाने वस्तुनिष्ठ परिस्थितीचा अहवाल पाठवला होता. अहवालानुसार २५ जानेवारीला छावणी सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. 

मागील दीड महिन्याच्या कालावधीत छावणीसाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल झाले. अटी व शर्तींची पूर्तता पाहून १६५ छावण्यांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आज (सोमवार) अखेर मंजुरी दिली आहे. यातील सहा चारा छावण्यांची परवानगी यापूर्वी रद्द करण्यात आली आहे.

अन्यथा छावणीची परवानगी रद्द  संस्थांतर्फे ज्या गावात छावणी मंजूर आहे, अशा संस्थांनी मंजुरी मिळाल्यापासून आठ दिवसांच्या आत छावणी सुरू करावी. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या संगोपनात अडथळा निर्माण झाल्याच्या कारणावरून मंजूर चारा छावणीची परवानगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या या आदेशानुसार रद्द करण्यात येणार असल्याची माहिती टंचाई विभागाने दिली.   

तालुकानिहाय मंजूर छावण्या 
नगर २३
पारनेर १५
शेवगाव २७
श्रीगोंदे १५
पाथर्डी ५२
कर्जत १५
जामखेड १८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com