इचलकरंजी येथे आजपासून जिल्हा कृषी महोत्सव

इचलकरंजी येथे आजपासून जिल्हा कृषी महोत्सव
इचलकरंजी येथे आजपासून जिल्हा कृषी महोत्सव

कोल्हापूर : शासनाचा कृषि विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने शुक्रवारपासून (ता. १८) जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव इचलकरंजी येथील हत्ती चौकाजवळील योग जिम्नेशियम मैदानावर येत्या २२ जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्याची तयारी पूर्ण झाली असून महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (ता.१९) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांची उद्घाटनप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहील. जिल्हा कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत सुभेदार बोलत होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदिप सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, मेडाचे प्रकल्प अधिकारी महेश माघमोडे, महाबीजचे एन.जी. इनामदार, जलसंधारण अधिकारी बी.के. साठे आदी उपस्थित होते.

या महोत्सवात २१६ स्टॉल्स असतील. ठिबक सिंचन,अन्नप्रक्रिया, मूल्यवर्धन, हायड्रोफोनिक्स, कोल्हापूरी गूळ, सेंद्रीय शेती निविष्ठा, गांडूळ खत, ॲक्वाकल्चर, जैवतंत्रज्ञान, सौर उर्जा वापर, दुग्ध व्यवसाय, कृषिविषयक प्रकाशने, हरितगृह, शेडनेट, पॅकेजींग, साठवणूक आदीचा समावेश असेल. सर्व शासकीय विभाग, कृषिविद्यापिठे, कृषि महाविदयालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्था, बँका यांचा सहभाग असेल.

महोत्सवात `विषमुक्त सेंद्रिय शेती` या संकल्पनेवर भर दिला असल्याचे सुभेदार यांनी सांगितले. ते म्हणाले, ``गट शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना समूह शेतीबाबत मार्गदर्शन होणार आहे. धान्य महोत्सवामध्ये उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यामधून दर्जेदार तूरडाळ, मूगडाळ व उडीदडाळ, बार्शी (सोलापूर) येथून उत्कृष्ठ ज्वारी (बार्शीशाळू) शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गटांच्या माध्यमातून ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होईल.`` 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com