पुणे जिल्हा बँकेचा दोन हजार कोटींचा पत आराखडा

पुणे जिल्हा बँकेचा दोन हजार कोटींचा पत आराखडा
पुणे जिल्हा बँकेचा दोन हजार कोटींचा पत आराखडा

पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण दोन हजार ८० कोटी १९ लाख रुपयांचा पत आराखडा तयार केला आहे. यात शेतीसाठी दोन हजार ५० कोटी ३४ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्जासाठी लागणाऱ्या रकमेची कोणतीही अडचणी येणार नसून, लवकरच खरीप हंगामासाठी पीककर्जाचे वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली. 

गेल्या वर्षी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण तीन हजार ८५८ कोटी ९३ लाख रुपयांचा पत आराखडा तयार केला आहे. यात शेतीसाठी २ हजार ७३४ कोटी ४४ लाख ४३ हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा जिल्हा अग्रणी बॅंकेकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला बिगर शेती पीककर्जाचे उद्दिष्ट लवकरच दिले जाणार आहे. जिल्ह्यात सहकारी बॅंकेच्या जवळपास २७५ शाखा आहेत. 

या शाखा गावातील स्थानिक सहकारी सोसायट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाचा पुरवठा करतात. जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० एवढी आहे. त्यापैकी जवळपास एक लाख ८९ हजारहून अधिक सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. यंदाही बॅंकेने शेतकऱ्यांसाठी पीककर्जाचे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर तीन लाखांच्या पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. 

यंदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज वेळेत उपलब्ध व्हावे म्हणून गेल्या वर्षी नव्याने १५ शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळणार आहे. गेल्या वर्षी पीककर्जासाठी दोन हजार ४२६ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. शेतीपूरक उद्योगासाठी ३०८ कोटी ११ लाख ९२ हजार रुपये, तर बिगर शेती कर्जासाठी एक हजार १२४ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीककर्जामध्ये ३७५ कोटी ९८ लाख रुपयांनी घट करण्यात आली आहे. तर शेतीपूरक व्यवसायासाठी २९८ कोटी ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

चालू वर्षी ठेवलेल्या एकूण उद्दिष्टापैकी खरीप हंगामासाठी खरीप १४३५ कोटी १८ लाख, तर रब्बी हंगामासाठी ६१५ कोटी १६ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. \ उद्दिष्ट ठेवलेल्या पीककर्जातून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, सोयाबीन, सूर्यफूल कापूस, ऊस, हरभरा, फळबाग, भाजीपाला पिकांना पीककर्जाचा पुरवठा केला जाणार आहे. तर शेतीपूरक कर्जातून ठिबक सिंचन, उपसा पाइपालाइन, ट्रॅक्टर, ट्रेलर, जेसीबी, शेतीपूरक अवजारे, शेळी, मेढीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, संरक्षित शेती, बिगर शेतीमध्ये शैक्षणिक, गृहकर्ज, साखर कारखाने व औद्योगिक कर्ज दिले जाते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जाचे उद्दिष्ट ः (रुपयांत) 
कर्ज प्रकार   गेल्या वर्षीचे पीककर्जाचे उद्दिष्ट   यंदाचे पीककर्जाचे उद्दिष्ट  
पीककर्ज २४२६ कोटी ३२ लाख ५० हजार रुपये   २०५० कोटी ३४ लाख रुपये 
शेतीपूरक   ३०८ कोटी ११ लाख ९२ हजार रुपये    २९८ कोटी ५० लाख 
बिगर शेती   १ हजार १२४ कोटी ४८ लाख ५१ हजार  रुपये   
एकूण   ३ हजार ८५८ कोटी ९३ लाख रुपये   २०८० कोटी १९ लाख रुपये 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com