महिला सक्षमीकरणात जिल्हा बँक देशात आघाडीवर ः शिरसाळकर

महिला सक्षमीकरणात जिल्हा बँक देशात आघाडीवर ः शिरसाळकर
महिला सक्षमीकरणात जिल्हा बँक देशात आघाडीवर ः शिरसाळकर

कोल्हापूर : बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणात कोल्हापूर जिल्हा बँक देशात आघाडीवर आहे, असे गौरवोद्गार नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक उदय शिरसाळकर यांनी काढले. बँकेच्या केंद्र कार्यालयात ‘ई शक्ती’ योजनेअंतर्गत महिला बचत गटांना विविध योजनांची माहिती, नोंदणी व मार्गदर्शन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘नाबार्डने सुरवातीच्या काळात ५०० गटांनी सुरवात करून देशात आजअखेर ८७ लाख इतके बचत गट स्थापन केले आहेत. मागील वर्षी २२.६० लाख गटांना ४७.१८ कोटी कर्जवाटप करून महिलांना आर्थिक प्रवाहात आणले. महिलांना उत्पन्नाचे साधन म्हणून बचत गटांमार्फत उद्योग व्यवसाय उभारणी करता येत असल्याने सदरची संकल्पना बचत गटाबरोबरच बँकेस उपयुक्त असल्याने बचत गट चळवळ यशस्वी झाली आहे.’’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे सीईओ डॉ. ए. बी. माने यांनी केले. ते म्हणाले, ‘‘ई शक्ती’ योजनेअंतर्गत डिजिटायझेशन करून दप्तर अद्ययावत ठेवले जाणार आहे. तसेच पंतप्रधान जीवनज्योती योजना (पीएमजेजेवाय) व पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) या योजनांचा लाभ घेण्यासाठी सदस्यांचे विमा उतरवण्यात आले.

‘ई शक्ती’ योजनेमधील व बँकेतील इतर उद्योग व्यवसाय करणाऱ्या सौ. समित्रा फराकटे, शेळेवाडीच्या सौ. गीता पाटील, कळंबाच्या सौ. पल्लवी चव्हाण, राजारामपुरीच्या सौ. प्रतिभा जाधव यांनी बचत गटात नसताना व बचत गटात आल्यावर व्यवसाय वाढीसाठी झालेला प्रवास सांगितला. तसेच आर्थिक सक्षमता कशी आली याबाबत मनोगत व्यक्त केले. ई शक्ती अतंर्गत जिल्हा बँकेमार्फत बचत गटांचे डिजिटायझेशन केले आहे. यामध्ये ६७ बचत गटाच्या महिलांना ८४ लाख कर्जाचे वाटप झाले आहे. तसेच ३६८ महिलांचे पी.एम.एस.बी.वाय. व ११९ महिलांचे पी.एम.जे.जे.बी.वाय. अंतर्गत विमा योजनेत सहभागी करून त्यांना २ लाखाचा अपघाती जीवन विम्याचे कवच उपलब्ध करून दिले आहे. या वेळी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा प्रबंधक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com