तनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची इच्छा : गायकर

District Bank wishes to run the Tanapure factory : Gaikar
District Bank wishes to run the Tanapure factory : Gaikar

नगर : "डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची कामगिरी आजवर जिल्ह्यात उत्कृष्ट राहिली आहे. जिल्हा बॅंकेनेही कारखान्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी कायम सहकार्याची भूमिका ठेवली. मात्र, कारखाना बंद असल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. थकबाकी शंभर कोटींच्या पुढे जाऊन बॅंकही अडचणीत येईल. त्यामुळे बॅंकेलाही नियमानुसार कारवाई करून कारखान्याचा ताबा घ्यावा लागेल. त्यानंतर कोणी ठपका ठेवू नये’’, असे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी सांगितले. 

कारखान्याबाबत माहिती देण्यासाठी गायकर यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा बॅंकेचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जनसंपर्क अधिकारी भारत पाटील आदी उपस्थित होते. 

गायकर म्हणाले, "जिल्हा बॅंक संचालक मंडळाने १२ सप्टेंबर २०१३ रोजी झालेल्या सभेत कर्जवसुलीसाठी कारखाना ताब्यात घेण्याचे ठरविले. मात्र, तो मिळाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यानंतर कारखान्यावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. २८ जुलै २०१५ रोजी प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांनी कारखान्याची देवळाली प्रवरा, बेलापूर व चिंचविहिरे येथील मिळकतीची लिलावाद्वारे विक्री करून कर्जवसुली करावी, असे सांगण्यात आले. मात्र, विक्री होऊ शकली नाही. २४ एप्रिल २०१७ रोजी राहुरी तहसीलदारांनी कारखान्यातील सर्व मालमत्तेचा ताबा घेऊन ती बॅंकेकडे सुपूर्द केली.'' 

‘‘२१ कोटी ४९ लाख ४२ हजार वसूल होऊ शकणार नाहीत. ही संचालक मंडळाची जबाबदारी होती. परंतु त्यांनी कराराचा भंग केला. त्यामुळे जिल्हा बॅंक अडचणीत येत असल्याने नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही गायकर यांनी सांगितले.

`विखे पिता-पुत्रांचे कारस्थान भोवणार `

शिवाजी कर्डीले यांचा यावेळी बोलण्याचा सारा रोख माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर होता. र'विखे पिता-पुत्रांनी विनंती केली. त्यामुळे कारखाना संचालकांच्या ताब्यात देऊन सुरू केला. मात्र, ४२ कोटी रुपये थकले. कामगारांचेही पगार थकवले. त्यांनी फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूनेच ‘तनपुरे' ताब्यात घेतला का? लोकसभेची निवडणूक झाली की हात वर केले. थकबाकीमुळे कारवाई झाली की बॅंकेवर ठपका ठेवण्याचा यांचा बेत दिसतो. नियमानुसार कारवाई झाली, तर विखेंचेच कारस्थान कारखान्याला भोवणार आह,'' अशी टीका त्यांनी केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com