नाशिक जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जवसुलीला वेग

जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जवसुलीला वेग
जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जवसुलीला वेग

नाशिक  : जिल्हा बँकेतील थकीत मोठी कर्जे वसूल करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. याबाबतच्या सूचना वसुली पथकाला देण्यात आल्या आहेत. वणी विभागातील विशेष वसुली अधिकारी बी. एन. भदाणे यांना वसुली कामकाजात दिरंगाई केल्याने निलंबित करण्यात आले. 

बँकेचे एकूण सन २०१८-१९ मध्ये २३३१ कोटी रुपये वसुली होणे बाकी आहे. त्यापैकी १९२१ कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी दिंडोरी तालुक्यात ३५८.५० कोटींची थकबाकी आहे. त्याच्या कर्जवसुलीचे काम सुरू आहे. यासह शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील सर्व सेवकांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, ज्येष्ठ संचालक गणपत बाबा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खरे, कर्जवसुली विभागाचे व्यवस्थापक उपस्थित होते. जे कर्मचारी वसुलीच्या कामकाजात टाळाटाळ करतील, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद या वेळी देण्यात आली.

थकबाकीदार सभासदांची प्राप्त १०१ वसुली प्रमाणपत्राच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कर्जवसुली करावी. ती न झाल्यास सभासदांची शेतजमीन जप्त करून लिलाव प्रक्रिया राबवावी, असे आदेश देण्यात आले.

शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ओटीएसमध्ये प्राप्त १.५० लाखांवरील उर्वरित रक्कम भरून घेण्यास २०५३ सभासद पात्र आहेत.  त्यांच्याकडून उर्वरित रक्कम भरणा करून घेण्याबाबत आदेश देण्यात आले. त्यापोटी बँकेस २९ कोटी प्राप्त होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com