agriculture news in marathi, district collecter gives order to increase crop loan percentage, amaravati, maharashtra | Agrowon

अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का वाढवा ः शैलेश नवाल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत तक्रारनिवारणाकरिता प्रत्येक तालुक्यात समिती गठित करण्यात आली असून, समितीने वेळोवेळी बैठका घेऊन तक्रारींचे निवारण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. त्याचप्रमाणे खरीप कर्ज वाटपाचे प्रमाण जुलैअखेरपर्यंत ५५ टक्क्यांहून अधिक करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. नवाल यांनी पीककर्ज व विविध योजनांचा आढावा घेतला, त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत तक्रारनिवारणाकरिता प्रत्येक तालुक्यात समिती गठित करण्यात आली असून, समितीने वेळोवेळी बैठका घेऊन तक्रारींचे निवारण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. त्याचप्रमाणे खरीप कर्ज वाटपाचे प्रमाण जुलैअखेरपर्यंत ५५ टक्क्यांहून अधिक करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. नवाल यांनी पीककर्ज व विविध योजनांचा आढावा घेतला, त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

शेतकरी सन्मान योजनेत बऱ्याच कर्ज खात्यांवर अपुरी माहिती, चुकीची माहिती, यामुळे प्रक्रिया होऊ शकली नाही. याप्रकरणी प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समिती गठित करण्यात आली आहे. सहायक निबंधक (सहकारी संस्था) हे समितीचे अध्यक्ष असून, सहकारी, अग्रणी बँकेचे प्रतिनिधी, लेखापरीक्षक, सहकार अधिकारी हे सदस्य आहेत. या 
समितीने नियमित बैठकांद्वारे तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

खरीप पीककर्ज वितरणाचा आढावा घेताना ते म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेतर्फे २८ टक्के, राष्ट्रीयीकृत व्यापारी बँकांतर्फे १८ टक्के व ग्रामीण बँकेतर्फे २५ टक्के कर्ज वितरण झाल्याचे दिसते. हे प्रमाण अत्यंत कमी असून, येत्या पंधरवड्यात ते ५५ टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न करावा. बँकांनी अधिकाधिक मेळावे घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धीही करावी. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती ठळकपणे शाखेत मांडावी.
 


इतर बातम्या
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘सेवा हमी'साठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसितसोलापूर : ‘‘सेवा हमी हक्क कायद्याची अंलबजावणी...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...