वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पिकांची पाहणी

वर्धा ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी करून गतिमान सर्वेक्षण व पंचनाम्याविषयी सूचना केल्या. 

पीक नुकसान पाहणीवेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तहसीलदार, उपविभागीय कृषी अधिकारी घोडमारे, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. वर्धा तालुक्‍यातील मदनी येथील शेतकरी अशोक नागतोडे, समुद्रपूर तालुक्‍यातील भीमराव भगत, वायगाव येथील शेतकरी ज्ञानबा ढोले व हिवरा येथील शेतकरी गणेश राऊत यांच्या शेताला भेट दिली. 

नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी त्यांनी केली. श्री. ढोले यांच्या एक एकर शेतामध्ये सोयाबीन होते. यातील ७० टक्‍के पिकाचे नुकसान झाले आहे. हिवरा येथील शेतकरी घनश्‍याम भूरे यांच्या शेतातील कापूस पिकाचे ७० टक्‍के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी यांनी समुद्रपूर तालुक्‍यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीन व कापूस पिकाचे कृषी विभाग व विमा कंपनीने सर्वेक्षण व पंचनामे करून अशा सूचना त्यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com