ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी बांधावर

माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रमास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ई -पीक पाहणी ॲप चालू आहे का? तुम्ही ॲपवर माहिती भरली का, अशी विचारणा या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केली.
District Collector of Solapur On the spot for e-crop inspection
District Collector of Solapur On the spot for e-crop inspection

सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक पाहणी कार्यक्रमास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ई -पीक पाहणी ॲप चालू आहे का? तुम्ही ॲपवर माहिती भरली का, अशी विचारणा या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केली. तसेच जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी ई-पीक पाहणी ॲपविषयीची माहिती शेतकऱ्यांना समजावून दिली.

श्री. शंभरकर यांनी माढा तालुक्यातील वरवडे आणि मोडनिंब या गावातील शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी केली. ई-पीक पाहणी ॲप वापरताना काय अडचणी आल्या का? पिकांची नोंद ॲपमध्ये केली का, अशी विचारणाही त्यांनी केली. ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. जे पीक आहे त्याची अचूक नोंद करता येते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी देण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे. आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. 

शेतकऱ्यांनी ॲपमध्ये भरलेली ई-पीक पाहणीच्या माहितीची नोंद तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी त्वरित घेण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या. ई-पीक पाहणी ॲप जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण, मंडल अधिकारी श्री. गायकवाड यांच्यासह तलाठी, शेतकरी उपस्थित होते.

ई-पीक पाहणीमुळे सोयच ई-पीक पाहणी ॲपमुळे आम्हाला शेतात जाऊन पिकांची अचूक नोंद करता येऊ लागली आहे. तलाठी कार्यालयात जावे लागत नसल्याने वेळेची बचत होत आहे. हा शासनाचा उपक्रम चांगला असल्याची प्रतिक्रिया वरवडेचे शेतकरी नवनाथ घाडगे आणि मोडनिंबचे विजयकुमार नामदे यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com