agriculture news in marathi, district collector take a review of drought situation, aurangabad, maharashtra | Agrowon

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दुष्काळी स्थितीचा आढावा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

विहामांडवा, जि. औरंगाबाद  : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी (ता. ११) पैठण तालुक्‍यातील आडुळ, पाचोड, विहामांडवा व नांदर येथे प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. 

विहामांडवा, जि. औरंगाबाद  : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शनिवारी (ता. ११) पैठण तालुक्‍यातील आडुळ, पाचोड, विहामांडवा व नांदर येथे प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. 

या भेटीदरम्यान श्री. चौधरी यांनी दुष्काळी उपाययोजनांबाबत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. सकाळी दहा वाजता आडुळ येथील मोसंबी फळबागांना भेटी देऊन त्यांनी तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पाचोड येथील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. केकत जळगाव येथील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम शेतीची पाहणी केली. त्यानंतर चौंढाळा येथील चारा छावणीत जाऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

परिसरातील पाणीटंचाईचा आढावा घेत त्यांनी काही विहिरींना भेटी दिल्या. विहामांडवा येथील दामोदर वैद्य यांच्या शेतातील नावीन्यपूर्ण ड्रॅगन फ्रुट शेतास भेट दिली. राज्य शासनाच्या सामूहिक शेततळे व महाराष्ट्र कृषी विभागअंतर्गत राबवलेल्या योजनेच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. नांदर येथील ग्रामस्थांशी दुष्काळ निवारणाबाबत चर्चा केली. या वेळी जलस्रोतांची पाहणी, दुष्काळ निवारण, अत्यल्प पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांची पाहणी, फळबागा योजनेचा प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला. 

या वेळी तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, कृषी अधिकारी अनिल खादगावकर, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत नरके, विशाल साळवे, कृषी पर्वेक्षक किशोर पाडळी, कृषी सहायक यशवंत चौधरी, सरपंच भीमराव थोरे, सतीश काळे, भाऊसाहेब काळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...