agriculture news in marathi, district collectors have the right to prevention of malpractices in fodder camps, pune, maharashtra | Agrowon

छावण्यांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

पुणे  : दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी सुरू केलेल्या चारा छावण्यांमधील गैरव्यवहार रोखण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. छावणीची मान्यता काढल्यास न्यायालयात दाद न मागण्याची अट देखील छावणीचालकांवर टाकण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे  : दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी सुरू केलेल्या चारा छावण्यांमधील गैरव्यवहार रोखण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. छावणीची मान्यता काढल्यास न्यायालयात दाद न मागण्याची अट देखील छावणीचालकांवर टाकण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. 

“राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्याने चारा छावण्यांची संख्या १३४९ पर्यंत गेली आहे. यातून ९ लाख जनावरांचा सांभाळ केला जात आहे. काही छावण्यांमध्ये जनावरांची संख्या खोटी देण्यात आली आहे. तसेच, काही छावण्यांमध्ये चारा व पाणीपुरवठ्यात गलथानपणा दिसून येतो. मात्र शेतकऱ्यांना अडचण दिसताच तहसीलदारांकडे लेखी तक्रार करावी. त्यामुळे महसूल विभागाला अशी चौकशी दडपणे अवघड जाते,” असे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले.

“छावण्यांच्या कामकाजात सरकारने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे कोणतीही छावणी कारण न देता तत्काळ बंद करण्याचे अधिकार महसूल विभागाला दिले गेले आहेत. गलथानपणामुळे मान्यता काढलेल्या छावणीचालकाला न्यायालयात दाद मागता येणार नाही. तसे हमीपत्र राज्यातील सर्व छावणीचालकांकडून लिहून घेण्यात आलेले आहे,” असेही महसूल विभागाचे म्हणणे आहे.  

“जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याशिवाय छावणीचालकाला अनुदान मिळत नाही. त्यामुळे छावणी नियोजनात राजकीय हस्तक्षेप होत नसल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीने छावण्यांची तपासणी करून दंड करावा, अशी दंडात्मक रक्कम मूळ बिलातून वजा करून छावणीचालकाला पेमेंट करावे, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. 

छावणीचालक एकवेळ दंडात्मक कारवाईच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू शकतात; मात्र न्यायालयात जाऊ शकत नाहीत. जनावरांचे हाल होत असल्यास शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार, प्रांत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे साधा तक्रार अर्ज पाठवावा. त्याची दखल घेतली जाईल,” असेही महसूल विभागाचे म्हणणे आहे.

निवारा शेडची जबाबदारी शेतकऱ्यांची नाही
“जिल्हाधिकाऱ्यांनी छावणी मंजूर करताना छावणीचालकाकडून पाच लाख रुपयांची अनामत रक्कम घेतलेली आहे. ही रक्कम जप्त करता येऊ शकते. अटीशर्तींचे गंभीरपणे उल्लंघन होत असल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. छावणीचालकाने रोज सकाळी ८ वाजता जनावरांची संख्या तहसीलदारांना कळविणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याला छावणीतील जनावरे सकाळी आठ पूर्वीच घरी घेऊन जाण्याचा अधिकार आहे. अशा जनावरासाठी अनुदान मागता येणार नाही. अनेक छावण्यांमध्ये शेतकरी स्वतःच शेड तयार करतात. मात्र जनावरांचे ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी निवारा शेड छावणीचालकानेच उभारले पाहिजे, असेही महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...