‘किसान सन्मान निधी’ अन्य खात्यांत वर्ग न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
‘किसान सन्मान निधी’ अन्य खात्यांत वर्ग न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

‘किसान सन्मान निधी’ अन्य खात्यांत वर्ग न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यांवर पहिला हप्ता जमा झाला. मात्र हा निधी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरून परत जाण्याचा, बॅँकांकडून कर्ज खात्यात परस्पर वर्ग करण्याचा प्रकार घडला. याबाबत चांदवड, येवला तालुक्यात अशा घटना समोर आल्या. त्यामुळे या योजनेची रक्कम कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन. बी यांनी दिले. 

योजनेतील निधीबाबत जिल्हा प्रशासनाने अग्रणी बँकेच्या सर्व शाखांकडे परिपत्रक पाठविले आहे. अशा प्रकारची तक्रार असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन कक्षाकडे तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे.

निधी कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्याचे प्रकार जिल्ह्यामध्ये घडले. नावातील दोष व इतर तांत्रिक कारणांमुळे बँक खात्यांत जमा झालेली रक्कम परत गेल्याबाबतच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. या प्रकरणात लाभार्थ्यांच्या बाबतीत आवश्यक दुरुस्ती करून ती व्यक्ती एकच असल्याची खात्री झाल्यानंतर रक्कम पुन्हा खात्यावर जमा होईल, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले.

वनपट्ट्यांच्या वाटपानंतर योजनेचा लाभ

वन कायद्यांतर्गत वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले, परंतु नाव सातबारा सदरी नसलेले वनपट्टाधारक शेतकरीदेखील योजनेस पात्र आहेत. याबाबतच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. ज्यांना अद्याप वनपट्ट्यांचे वाटप झाले नाही, अशांनाही त्याचे वाटप झाल्यावर, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येईल. काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी ०२५३-२३१५१७५ अथवा २३१५०८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com