agriculture news in marathi, District co_operatives demands ten thousand crores from State co_operative for crop loan | Agrowon

राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे ठाण; मागणी १० हजार कोटींची अन्‌ मिळाले २७०० कोटी
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह दुष्काळ, पाण्याअभावी पिकांनी टाकलेल्या माना, कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांचा हात आखडता अन्‌ शेतकऱ्यांचे जिल्हा बॅंकांच्या दारात हेलपाटे, या पार्श्‍वभूमीवर बळिराजाला कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यभरातील २८ जिल्हा बॅंकांनी २०१९-२० साठी राज्य बॅंकेकडे दहा हजार ३० कोटींच्या कर्जाची मागणी केली. मात्र, १६ जिल्हा बॅंकांना दोन हजार ७४९ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज दिले असून, १२ जिल्हा बॅंकांना ठेंगाच दाखविण्यात आला आहे.

सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह दुष्काळ, पाण्याअभावी पिकांनी टाकलेल्या माना, कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांचा हात आखडता अन्‌ शेतकऱ्यांचे जिल्हा बॅंकांच्या दारात हेलपाटे, या पार्श्‍वभूमीवर बळिराजाला कर्ज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यभरातील २८ जिल्हा बॅंकांनी २०१९-२० साठी राज्य बॅंकेकडे दहा हजार ३० कोटींच्या कर्जाची मागणी केली. मात्र, १६ जिल्हा बॅंकांना दोन हजार ७४९ कोटी ५४ लाख रुपयांचे कर्ज दिले असून, १२ जिल्हा बॅंकांना ठेंगाच दाखविण्यात आला आहे.

नगर जिल्हा बॅंकेने अकराशे कोटींच्या कर्जाची मागणी राज्य बॅंकेकडे केली अन्‌ बॅंकेला ९०० कोटींचे कर्ज मंजूर झाले. मात्र, अद्याप त्यापैकी दमडाही नगर जिल्हा बॅंकेला मिळालेला नाही. 

सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे-नंदुरबार, औरंगाबाद, बुलडाणा, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया व नागपूर या ११ जिल्हा बॅंकांनीही अडचणीतील बळिरजिाला आधार देण्याकरिता कर्जवाटप सुरळीत व्हावे म्हणून राज्य बॅंकेकडे दोन हजार कोटींच्या कर्जाची मागणी केली. त्यानुसार राज्य बॅंकेने ११ जिल्हा बॅंकांना एक हजार ६५६ कोटींचे कर्ज मंजूर केले. मात्र, अद्याप एक रुपयाही कर्ज दिलेले नाही. त्यामुळे या जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप सद्यःस्थितीत ठप्पच असून, शेतकऱ्यांना खासगी सावकारांशिवाय पर्यायच राहिला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्हा बॅंकेलाही ३०० कोटींपैकी १०० कोटी रुपयेच मिळाले आहेत.

जिल्हा बॅंकांची सद्यःस्थिती 

  • कर्ज मागणी केलेल्या बॅंका : २८
  • राज्य बॅंकेकडून कर्ज मंजूर : ८,०८५.६० कोटी रु.
  • कर्ज मागणीची रक्‍कम : १०,०३० कोटी रु.
  • कर्ज वितरित : २,७४९.५४ कोटी रु.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती अन्‌ बॅंकेची वाढलेली थकबाकी, यामुळे राज्य बॅंकेकडे कर्जवाटपासाठी ५५३ कोटींची मागणी केली आहे. मात्र, त्यापैकी १०० कोटी रुपयेच मिळाले आहेत. दरम्यान, वाढीव व्याजदर अन्‌ दुष्काळासह अन्य नैसर्गिक आपत्तीवेळी सरकारकडून मिळणाऱ्या कर्जवसुली थांबविण्याच्या आदेशामुळे जिल्हा बॅंका अडचणीत आहेत.
- डॉ. ए. बी. माने, 
अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, कोल्हापूर

इतर अॅग्रो विशेष
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
प्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...
सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक ! गेल्या...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...