अमरावतीत ‘समृद्धी’ला जिल्हा परिषद सदस्यांची हरकत

‘समृद्धी’ला जिल्हा परिषद सदस्यांची हरकत
‘समृद्धी’ला जिल्हा परिषद सदस्यांची हरकत

अमरावती : सामान्यांसह जिल्हा परिषद सदस्यांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन समृद्धी महामार्गाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याच्या हालचालींना जिल्हा परिषदेत वेग आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या आमसभेत त्या संदर्भातील ठराव आणून तो मंजूर करण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-मुुंबई या प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठी ना हरकत मिळावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार ऑक्‍टोबर २०१८ मध्ये जिल्हा परिषदेच्या आमसभेत प्रस्ताव मंजूर करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. त्या वेळी आमसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यातच सर्व विषय मंजूर करण्यात आले. त्यामध्ये या प्रमाणपत्राचाही समावेश होता. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासन प्रमुखांनी समृद्धी महामार्गासाठी जिल्हा परिषदेमार्फत इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवर कामे करण्यासाठी काही अटी, शर्तीच्या अधीन राहून नाहरकत प्रमाणपत्र दिले.

 जिल्हा परिषदेच्या कार्यकक्षेतील नांदगाव खंडेश्‍वर, चांदूररेल्वे आणि धामणगावरेल्वे या तीन तालुक्‍यांतून समृद्धी मार्ग जात आहे. या महामार्गाच्या कामात येत असलेले रस्ते ओलांडण्यासाठी व त्यावर पुलांचे बांधकाम करण्यासाठी हे नाहरकत प्रमाणपत्र आहे. 

आता विरोध वाढला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गासाठी ना हरकरत देतेवेळी कोणाचाच विरोध नव्हता. आता मात्र सामान्य नागरिकांसह जिल्हा परिषद सदस्यांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वीचे प्रमाणपत्र रद्द करण्याची या सर्वांची मागणी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आगामी आमसभेत या विषयावर वातावरण तापण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com