Agriculture news in marathi District council officials at Amravati now dress code | Agrowon

अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना आता ड्रेसकोड

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सोमवार आणि शुक्रवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड घालावा लागणार असून, सोमवार (ता.१७) पासून याची अंमलबजावणी होणार आहे. 

अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सोमवार आणि शुक्रवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड घालावा लागणार असून, सोमवार (ता.१७) पासून याची अंमलबजावणी होणार आहे. 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड असावा, या बाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख आग्रही आहेत. त्यांनी सातत्याने या संदर्भाने पाठपुरावा केला. त्यानंतर शिपाई आणि चालकांना गणवेश सक्‍ती करण्यात आली. सद्या चतुर्थश्रेणी कर्मचारी गणवेशातच कर्तव्य बजावतात. सोमवार (ता. १७) पासून अधिकारी ते कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच ड्रेसकोड सक्‍ती करण्यात आली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आठवडाभर असली तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोमवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस ड्रेसकोड असणार आहे. याबाबत अधिकाऱ्यांना समन्वयक समिती सभेत सूचना देण्यात आल्या आहेत. 

या निर्णयामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी पांढरा शर्ट व काळी पॅंट परिधान करून कार्यालयात येणार आहेत. ड्रेसकोडच्या माध्यमातून चांगला संदेश जाणार असल्याने कर्मचाऱ्यांनी देखील याबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हा निर्णय घेतला आहे.

साडी किंवा ड्रेस
पुरुष अधिकारी, कर्मचाऱ्यांना पांढरा शर्ट व काळी पॅंट असा गणवेश राहणार आहे. महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र साडी किंवा ड्रेस यापैकी काहीही परिधान करता येणार असून, रंग ठरविण्याची मुभा देण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...