वैशाली येडे यांच्यासाठी जिल्ह्यात प्रचारनिधी संकलन

वैशाली येडे यांच्यासाठी जिल्ह्यात प्रचारनिधी संकलन
वैशाली येडे यांच्यासाठी जिल्ह्यात प्रचारनिधी संकलन

नाशिक : ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, अशा उमेदवारांना पक्ष तिकिटे देतात. मात्र याला छेद देत प्रहारतर्फे आमदार बच्चू कडू यांनी विधवा महिला शेतकरी वैशाली येडे यांना यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली. त्यामुळे प्रादेशिक व राष्ट्रीय पक्षांना चपराक बसली आहे. या उमेदवारीमुळे येडे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी चांदवड तालुक्यातील कार्यकर्ते गावोगाव जाऊन प्रचारनिधी गोळा करीत आहेत. 

निवडणुकीसाठी उमेदवार देताना आर्थिक आणि मसल पॉवरचा विचार होतो. त्यानंतर उमेदवारी ठरते. मात्र कडू यांनी गरीब, शेतकरी व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधवा महिलेला उमेदवारी दिली. यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधवा शेतकरी महिलांच्या व्यथा मांडल्या. 

सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. आजपर्यंत या विभागाकडे कोणीही पाहिले नाही. त्यामुळे शेतीप्रश्न व विधवा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हा चिंतेचा विषय ठरला आहे. या पार्श्र्श्वभूमीवर येडे यांना उमेदवारी देण्यात आली.

 त्यांच्या प्रचारनिधीसाठी गावोगावी जाऊन आर्थिक मदत गोळा करण्याचे काम प्रहारचे तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, रेवण गांगुर्डे, राम बोरसे, कैलास पगार, वैभव गांगुर्डे, मोहन जाधव आदी कार्यकर्ते करीत आहेत. हा प्रचारनिधी जमा झाल्यानंतर तो वैशाली येडे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com