अकोला येथे जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळा  

अकोला येथे जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळा  
अकोला येथे जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळा  

अकोला  ः कीटकनाशक फवारताना खबरदारी घेण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. तथापि कीटकनाशक फवारताना विषबाधा होणे व त्यानंतर तातडीने करावयाच्या उपचारांबाबत शेतकऱ्यांना मदत करणे ही सामूहिक जबाबदारी असून, तात्काळ व योग्य उपचार देणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यशाळेचे महत्त्व आहे,’’ असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.  पिकांवर फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांना होणाऱ्या विषबाधांबाबत तत्काळ व योग्य वैद्यकीय उपचार सेवा देण्यासाठी सोमवारी (ता. ९) जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर होते. या वेळी अहमदाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. तेजस प्रजापती हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या डॉ. आरती कुलवाल, संतोष परांडे, गौरव भारसाकळे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना, तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कीटकनाशक फवारणी करताना विषबाधित झालेल्या रुग्णांवर करावयाच्या उपचार पद्धतीविषयी माहिती देण्यात आली. बाधित होते वेळी वापरलेले कीटकनाशक व त्यानुसार करावयाचा औषधोपचार, उपचार पद्धती, उपचार पश्चात देखभाल आदींविषयी सखोल माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com