Agriculture news in marathi; District level poison management workshop in Akola | Agrowon

अकोला येथे जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळा  

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

अकोला  ः कीटकनाशक फवारताना खबरदारी घेण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. तथापि कीटकनाशक फवारताना विषबाधा होणे व त्यानंतर तातडीने करावयाच्या उपचारांबाबत शेतकऱ्यांना मदत करणे ही सामूहिक जबाबदारी असून, तात्काळ व योग्य उपचार देणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यशाळेचे महत्त्व आहे,’’ असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले. 

अकोला  ः कीटकनाशक फवारताना खबरदारी घेण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. तथापि कीटकनाशक फवारताना विषबाधा होणे व त्यानंतर तातडीने करावयाच्या उपचारांबाबत शेतकऱ्यांना मदत करणे ही सामूहिक जबाबदारी असून, तात्काळ व योग्य उपचार देणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यशाळेचे महत्त्व आहे,’’ असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले. 

पिकांवर फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांना होणाऱ्या विषबाधांबाबत तत्काळ व योग्य वैद्यकीय उपचार सेवा देण्यासाठी सोमवारी (ता. ९) जिल्हास्तरीय विषबाधा व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर होते.
या वेळी अहमदाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. तेजस प्रजापती हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या डॉ. आरती कुलवाल, संतोष परांडे, गौरव भारसाकळे आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना, तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कीटकनाशक फवारणी करताना विषबाधित झालेल्या रुग्णांवर करावयाच्या उपचार पद्धतीविषयी माहिती देण्यात आली. बाधित होते वेळी वापरलेले कीटकनाशक व त्यानुसार करावयाचा औषधोपचार, उपचार पद्धती, उपचार पश्चात देखभाल आदींविषयी सखोल माहिती देण्यात आली.


इतर बातम्या
वनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था पुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...