Agriculture news in Marathi District Milk Union wrote a letter to the animal feed companies | Agrowon

औरंगाबाद जिल्हा दूध संघाने लिहिले पशुखाद्य कंपन्यांना पत्र 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

औरंगाबाद : ‘कोरोना’च्या संकटात मागणी व विक्री घटल्याने दुधाचे दर ५ ते ७ रुपयांनी घसरून दूध उत्पादक संकटात सापडला आहे. अशावेळी उत्पादकाला आधार म्हणून पशुखाद्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या पशुखाद्याचे दर कमी करण्याचा विचार करावा, अशी मागणी करणारे पत्र औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने पशुखाद्य निर्मिती कंपन्यांना गुरुवारी (ता. ९) पाठविले आहे. 

औरंगाबाद : ‘कोरोना’च्या संकटात मागणी व विक्री घटल्याने दुधाचे दर ५ ते ७ रुपयांनी घसरून दूध उत्पादक संकटात सापडला आहे. अशावेळी उत्पादकाला आधार म्हणून पशुखाद्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या पशुखाद्याचे दर कमी करण्याचा विचार करावा, अशी मागणी करणारे पत्र औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने पशुखाद्य निर्मिती कंपन्यांना गुरुवारी (ता. ९) पाठविले आहे. 

या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे म्हणाले, जिल्हा दूध संघाकडून आजच्या स्थितीत जवळपास ९० हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. ‘कोरोना’च्या संकटापूर्वी जिल्हा दूध संघाकडे संकलित होणाऱ्या एकूण दुधापैकी जवळपास ४५ ते ५० हजार लीटर दूध विक्री केले जायचे. तर उर्वरित दुधापासून बाय प्रॉडक्ट बनविले जायचे. त्यामुळे दूध उत्पादकाला बऱ्यापैकी दर मिळत होते. परंतु ‘कोरोना’च्या संकटामुळे जिल्हा दूध संघाच्या दुधाची विक्री २८ ते २९ हजार लिटरवर आली. शिवाय दुधापासून तयार होणाऱ्या बाय प्रॉडक्टची विक्रीही शून्यावर आली. त्यामुळे दुधाचे खरेदी दर पाच ते सात रुपयांनी खाली आले आहेत. विविध पशुखाद्य तयार करणाऱ्या कंपन्यांकडून वाजवी दरात जवळपास दीडशे ते दोनशे टन पशुखाद्य खरेदी करून ते पशुखाद्य ना नफा ना तोटा तत्त्वावर जिल्हा दूध संघ जिल्ह्यातील ३५ ते ४० हजार दूध उत्पादकांना पुरविण्याचे काम करते.आजघडीला ते २६ रुपये प्रतिकिलोने कंपन्या पशुखाद्य पुरवितात. दूध उत्पादक आपल्याकडील दूध देणाऱ्या जनावराला पाच ते सहा किलो पशुखाद्य खाऊ घालतो. दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नातील जवळपास ७० टक्के उत्पन्न हे पशुखाद्य वर खर्च केले जाते. परंतु आता दुधाच्या घसरलेल्या खरेदी दरामुळे उत्पादकाला तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. 

कंपन्यांना अभिप्राय कळविण्याची विनंती 
जिल्हा सहकारी दूध संघ अंतर्गत मागणीनुसार पुरवठा होणाऱ्या पशुखाद्याचे दर कमी करण्याचा विचार करण्याची मागणी जिल्हा सहकारी दूध संघाकडून गोदरेज ॲग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड रुमी टेक प्रायव्हेट लिमिटेड व बारामती ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. या पत्राच्या उत्तरादाखल आपला अभिप्राय कळविण्याची विनंतीही करण्यात आल्याचे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष श्री. काळे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...