नगर जिल्ह्यामध्ये पेरणी शंभर टक्क्यांच्या पुढे

नगर जिल्ह्यामध्ये पेरणी शंभर टक्क्यांच्या पुढे
नगर जिल्ह्यामध्ये पेरणी शंभर टक्क्यांच्या पुढे

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा अजूनही पुरेसा पाऊस नाही. मात्र अल्प पावसावरच खरिपाची पेरणी झालेली असून, पेरणीचे क्षेत्र सरासरीच्या तुलनेत शंभर टक्‍क्‍याच्या पुढे गेलेले आहे. बाजरीची मात्र ७५ टक्के क्षेत्रावरच पेरणी झालेली आहे. खरिपाची सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पेरणी झालेली असली तरी, अजूनही दुष्काळी तालुक्‍यात पाणी उपलब्ध झालेले नसल्याने धास्ती कायम आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदाही पावसाच्या अवेळी पणाचा खरिपाच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. यंदा आतापर्यंत खरिपाची ४ लाख ७८ हजार ६३८ हेक्‍टर क्षेत्रापैकी ४ लाख ९३ हजार ०३२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचे सर्वाधिक १ लाख ८२ हजार हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा मात्र बाजरीचे कमी क्षेत्र पेरले आहे. आत्तापर्यंत १ लाख ३५ हजार २४२ हेक्‍टरवर

म्हणजे ७५ टक्के बाजरीची पेरणी झाली आहे. तूर, मूग, उडीद यांची पेरणी मात्र सरासरीच्या दुप्पट झाली आहे. उडदाची पेरणी तर तब्बल पावणेचार पट म्हणजे सरासरीच्या ३७८ टक्के झाली आहे. मुगाची ३३२ टक्के, तुरीची २२८ टक्के, तर मक्याची ११९ टक्‍के पेरणी झाली आहे. सोयाबीच्या पेऱ्यानेही सरासरी ओलांडली आहे. सोयाबीनची आत्तापर्यंत १२०.३३ टक्के पेरणी झाली असून, सोयाबीनचे सरासरी ५८ हजार २८२ हेक्‍टर क्षेत्र आहे. मात्र आतापर्यंत ७० हजार १२८ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. कापसाच्या लागवडीनेही सरासरी ओलांडली आहे.

कापसाचे १ लाख ५ हजार ४२७ हेक्‍टर क्षेत्र आहे. तर आत्तापर्यंत एक लाख १३ हजार ७८६ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मक्याच्या क्षेत्रानेही सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे यंदा भुईमुगाचीही सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यामध्ये खरिपाची पेरणी, कापूस लागवड झालेली असली तरी अनेक भागांत पुरेसा पाऊस नव्हता, त्यामुळे पिके वाया जातात की काय याची भीती होती. मात्र गेल्या आठ दिवसांत सातत्याने अधूनमधून रिमझिम पाऊस झाला. त्याचा खरिपाच्या पिकांनाही फायदा झाला आहे. मात्र दुष्काळाच्या झळा सोसलेल्या तालुक्‍यात अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने पाणी साठवण झालेले नाही. त्यामुळे धास्ती कायम आहे.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (कंसात सरासरी क्षेत्र) भात ः ५३०३ (७,८८३), बाजरी ः १,३५,२४२ (१,८२,६३१), रागी, नागली ः २४६ (२,९१२), मका ः ६३,७०५ (५३,१४१), तूर ः २७,४०० (१२,०१८), मूग ः ३०,७४१ (९,२५८), उडीद ः ३१,११७ (८,२२०), भुईमूग ः ५१४१ (४,४२०), तीळ ः १२४ (४५७), कारळे ः ३६३ (३,६०५), सूर्यफूल ः ५४ (३,२२६), सोयाबीन ः ७०,१२८ (५८,२८२), कापूस ः १,१३,७८६ (१,०५,४२७).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com