Agriculture news in Marathi, In the district, two individual water schemes are closed | Agrowon

नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी योजना बंद 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली. काही भागांतून तर ओल्या दुष्काळाची मागणी झाली असली, तरी नगर जिल्ह्यामध्ये अजूनही स्रोताला पाणी आले नसल्याने जिल्ह्यामधील सात तालुक्यांत तब्बल २४१ वैयक्तिक पाणी योजना बंद आहेत. नगर जिल्ह्यामधील काही भागांत पुरेसा पाऊस नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 

नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली. काही भागांतून तर ओल्या दुष्काळाची मागणी झाली असली, तरी नगर जिल्ह्यामध्ये अजूनही स्रोताला पाणी आले नसल्याने जिल्ह्यामधील सात तालुक्यांत तब्बल २४१ वैयक्तिक पाणी योजना बंद आहेत. नगर जिल्ह्यामधील काही भागांत पुरेसा पाऊस नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्यांत गाव पातळीवर पाणीपुरवठा करण्यासाठी १४२६ वैयक्तिक पाणीपुरवठा योजना आहेत. गेल्यावर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्याने दुष्काळ पडला. पाणी पातळी वाढीला मदत झाली नाही. त्यामुळे जलस्रोत कोरडे पडल्याने वैयक्तिक पाणी योजना बंद पडल्या होत्या. बंद योजनांचा आकडा थेट साडेसातशेवर गेला होता. यंदाच्या पावसाळ्यातही फारसा त्यात फरक पडला नाही. बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला नसल्याने अगदी सप्टेंबरपर्यंत सुमारे साडेचारशे योजना बंद होत्या. मात्र, आक्टोबर महिन्यात परतीचा जोरदार पाऊस झाला. 

वीस दिवस सतत पाऊस पडत असल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नद्या, तलाव, विहिरींना पाणी आले. चार दिवसांपासून पाऊस बंद झालेला असला तरी अजूनही अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलेले आहे. ही भागातून तर ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, अजूनही काही भागांत जोरदार पाऊस नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. 

गाव पातळीवर पाणीपुरवठा करणाऱ्या वैयक्तिक योजनांपैकी बंद योजना चांगल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चालू झाल्या असल्या तरी सध्या बंद असलेल्या २९४ योजनांपैकी सात तालुक्यांत अजूनही तब्बल २४१ योजना केवळ उद्भवास पाणी नसल्याने बंद असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून जोरदार पाऊस पडूनही काही भागांत मात्र पाणीटंचाई कायम असल्याचे दिसत आहे. दुष्काळाच्या झळा सोसलेल्या पाथर्डी, कर्जत, नगर, पारनेर तालुक्यांतील योजनाच पाणी नसल्याने बंद आहेत.


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...