agriculture news in Marathi District wise productivity confirm for gram procurement Maharashtra | Agrowon

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता निश्‍चित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी हरभऱ्याची प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे.

परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सन २०१९-२० च्या हंगामात हमीभावाने (प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये) हरभरा खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी हरभऱ्याची प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

यंदा जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक १४ क्विंटल ५० किलो, तर रायगड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी ४ क्विंटल १८ किलो एवढी उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांतील उत्पादकतेत यंदा वाढ करण्यात आली आहे.

काही जिल्ह्याची उत्पादकता कमी करण्यात आली आहे, तर काही जिल्ह्यांची उत्पादकता गतवर्षी एवढीच आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडतर्फे राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसी अंतर्गंत शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. 
जिल्हानिहाय उत्पादकता निश्‍चित करण्यात आली आहे.

त्यानुसार हरभऱ्याची खरेदी करण्यात यावी, असे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागातर्फे राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक,
विदर्भ सहकारी पणन महासंघाचे कार्यकारी संचालक, महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आले आहेत.

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता, कंसात गतवर्षीची उत्पादकता (क्विंटलमध्ये) ः परभणी ७.५० (५.८०), हिंगोली १३ (१०.६०), नांदेड ९ (८), लातूर ६.५० (६.५०), उस्मानाबाद ६.२५ (४.५०), बीड ६ (१.७५), जालना ६.८७ (३.५०), औरंगाबाद ५.५० (४.५०), बुलडाणा ६.५० (८), अकोला १३ (११.५०), वाशीम ७.४० (६.५०), अमरावती १२ (१२), यवतमाळ ११.७० (८.१०), वर्धा १२.१० (१०.३०), नागपूर १२.५० (१०.५०), भंडारा ५.२६ (६), गोंदिया ८.१० (८.२०), चंद्रपूर ७.५० (७.५०), गडचिरोली ७ (४), नाशिक ७ (७.५०), धुळे ७.५० (६.५०), नंदूरबार ११.४० (६.८५), जळगाव १४.५० (९.६०), नगर ७.५० (२.२०), पुणे ७.६० (३.४०), सोलापूर ६.५० (६), सातारा १० (६), सांगली ६.२६ (६.८५), कोल्हापूर ९.९५ (९.५०), रत्नागिरी ४.७८ (६.९०), रायगड ४.१८ (३.९०), पालघर ७.२८( ६.६२), ठाणे ७.०१ (६.३७).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...