agriculture news in marathi, disturbance in online registration, parbhani, maharashtra | Agrowon

हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत अडथळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीनच्या आॅनलाइन नोंदणीच्या कामात सर्व्हर बंद राहू लागल्याने अडथळे येत आहेत. स्वतंत्र पीक पेरा प्रमाणपत्र तसेच आंतरपीक पद्धतीत एका पिकाचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे नोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे. परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत सोमवारपर्यंत (ता. १५) एकूण २६८३  शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीनच्या आॅनलाइन नोंदणीच्या कामात सर्व्हर बंद राहू लागल्याने अडथळे येत आहेत. स्वतंत्र पीक पेरा प्रमाणपत्र तसेच आंतरपीक पद्धतीत एका पिकाचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे नोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे. परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत सोमवारपर्यंत (ता. १५) एकूण २६८३  शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

परभणी जिल्ह्यात नाफेडच्या परभणी येथील केंद्रावर २५४ शेतकऱ्यांनी, जिंतूर येथे ५४०, सेलू येथे १ हजार १४८, पूर्णा येथे ८६ असे एकूण २२६५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे ३० शेतकऱ्यांनी, कळमनुरी येथे ६० शेतकऱ्यांनी, वसमत येथे ६० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. सेनगाव आणि जवळा बाजार येथे नोंदणी सुरू झाली नव्हती.

विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रांवर मुगासाठी १ हजार ९६ शेतकऱ्यांनी आणि सोयाबीनसाठी ६८९ शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर केली. त्यापैकी १२०१ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी करण्यात आली. विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या धर्माबाद (जि. नांदेड) येथील केंद्रांवर १३५ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली.

शेतकरी अडचणीत
विविध ठिकाणच्या केंद्रांवर सर्व्हर डाउन राहत असल्यामुळे नोंदणीसाठी अडथळे येत आहेत. आॅनलाउन सातबारा उताऱ्यावर स्वतंत्र पीक नोंदणी करता येत नसल्यामुळे तलाठ्याकडून हस्तलिखित पेरा प्रमाणपत्र घ्यावे लागत आहेत. तूर अधिक सोयाबीन, तूर अधिक मूग आदी आंतरपिके घेतलेली असल्यास एका पिकाचे निव्वळ क्षेत्र निश्चित करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना नसल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीत आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमालाची विक्री करावी लागत आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...