वीज कर्मचाऱ्यांचे दिवाळीत आंदोलन? 

राज्यात महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यांतील ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी तसेच सहायक कामगारांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान, बोनसची मागणी संघटनांनी केली आहे. दिवाळीपूर्वी यावर निर्णय न घेतल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
वीज कर्मचाऱ्यांचे दिवाळीत आंदोलन?  Diwali agitation of power workers?
वीज कर्मचाऱ्यांचे दिवाळीत आंदोलन?  Diwali agitation of power workers?

यवतमाळ : राज्यात महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या कंपन्यांतील ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी तसेच सहायक कामगारांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान, बोनसची मागणी संघटनांनी केली आहे. दिवाळीपूर्वी यावर निर्णय न घेतल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.  दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस देण्याबाबत संघर्ष समितीने मागणी केली होती. १२ दिवसांचा कालावधी लोटूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे कामगार, अभियंते व अधिकारी यांच्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तीनही वीज कंपनीतील कर्मचारी, अभियंता व अधिकारी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात व नंतर झालेल्या चक्री वादळात, महापुरात सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी वीज कर्मचाऱ्‍यांनी केली आहे. लॉकडाउन काळापासून महावितरणची वाढलेली थकबाकी वसूल करण्याकरिता कामगार, अभियंते व अधिकारी कठीण परिश्रम घेत आहेत. महावितरण कंपनीला दर महिन्याला महसूल सहा हजार कोटी मिळत आहे. यातून आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न आहेत. कोरोना महामारीचा प्रकोप असताना सुद्धा विक्रमी वीजनिर्मिती केली. अविरतपणे काम करून अखंडित वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम कर्मचारी व अभियंत्यांनी केले. तरीही मंडळ प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.  कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. २५) संघर्ष समितीची बैठक ऑनलाइन झाली. यात २५ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस जाहीर करण्याची मागणी केली. या संदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com