Agriculture news in Marathi Diwali payment with balance sheet in mind: President Taware | Agrowon

बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी पेमेंट ः अध्यक्ष तावरे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून सभासद व कामगारांना दिवाळीसाठी समाधानकारक पमेंट केले जाईल. अर्थात तो आकडा बुधवारी (ता. २८) संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर केला जाईल, असा विश्वास अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केला.

माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर यंदाच्या ऊस गळीत हंगामात प्रतिदिनी आठ हजार टनापर्यंत ऊस गाळप करून वीज, डिस्टिलरीसारख्ये प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न राहणार आहे. चालू हंगामात साखरेचे होणारे विक्रमी उत्पादन, त्यात गतवर्षीची साखर शिल्लक साठा. शिवाय विस्तारीकरण झालेल्या कारखान्यातील अनेक त्रुटी भरून काढण्यासाठी झालेला मोठा खर्च. ही प्रतिकूल स्थिती विचारात घेता बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून सभासद व कामगारांना दिवाळीसाठी समाधानकारक पमेंट केले जाईल. अर्थात तो आकडा बुधवारी (ता. २८) संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर केला जाईल, असा विश्वास अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केला.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ६४ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ रविवारी (ता. २५) उपाध्यक्ष तानाजी कोकरे व सुनंदा कोकरे या दांपत्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब तावरे बोलत होते.

श्री. तावरे म्हणाले, की संचालक मंडळाने प्रतिदिनी आठ हजार टन गाळप उरकण्यासाठी १० हजार टनांची ऊसतोडणी यंत्रणा भरली आहे. या प्रक्रियेत सभासदांच्या उसालाच अधिकचे प्राधान्य देले जाणार आहे. उत्तम माळेगावने यंदा १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. इंद्रसेन आटोळे, रामभाऊ तावरे या सभासदांनी दिवाळीसाठी प्रतिटन तीनशे रुपये जाहीर करावेत, असे आवाहन केले. तसेच सुरेश देवकाते यांनी बोनस देताना संचालक मंडळाने हात आकडता घेऊ नये, अशी मागणी केली.

यावेळी संचालक मदनराव देवकाते, अनिल तावरे, सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण, तानाजी देवकाते, प्रताप आटोळे, बन्सीलाल आटोळे, स्वप्नील जगताप, अलका पोंदकुले, सागर जाधव, संजय काटे, मंगेश जगताप, वसंत गावडे, विजय वाबळे, रवींद्र थोरात उपस्थित होते.

माळेगावची सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नांची पराकष्ठा करेल. अर्थात त्याकामी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्यही मोलाचे ठरणार आहे.
- बाळासाहेब तावरे, अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...