agriculture news in Marathi this Diwali special for us Maharashtra | Agrowon

आमच्यासाठी यंदाची विशेष दिवाळी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

व्यापाऱ्यांच्या मुजोरीला आम्ही मोडीत काढले. आमचा माल आम्ही आमच्याच अटींवर विकणार असे ठणकावले आणि चमत्कार घडला.

अमरावती ः व्यापाऱ्यांच्या मुजोरीला आम्ही मोडीत काढले. आमचा माल आम्ही आमच्याच अटींवर विकणार असे ठणकावले आणि चमत्कार घडला. आमच्या ६० टक्‍के निकषांवर संत्रा खरेदीस व्यापारी तयार झाले. चौसाळा गावातील आम्हा शेतकऱ्यांसाठी त्यामुळेच यंदाची दिवाळी विशेष ठरली असून, हेच आमच्यासाठी लक्ष्मीपूजन ठरले आहे, अशा शब्दांत चौसाळा ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील चौसाळा, भंडारज, निमखेड बाजार, चिंचोना, खिराळा, दहीगाव या सहा गावांमध्ये संत्रा खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी आपली नियमावली तयार केली होती. त्यामध्ये २० किलोऐवजी ३० किलो क्षमतेच्या मंडी क्रेटने खरेदी करणे, दलाली २ टक्‍के अशा शेतकऱ्यांसाठी अडचणींच्या अटींचा समावेश होता. क्रेटचा दर दिला जात असल्याने २० किलोऐवजी दहा किलो अधिक संत्रा फळ शेतकऱ्यांना द्यावी लागणार होती. त्यामुळे यात शेतकऱ्यांचे नुकसानच अधिक होणार होते.

परिणामी, २२ गावांतील शेतकऱ्यांनी सामूहिकपणे याचा विरोध करण्याचा निर्णय घेतला. ग्रामसुरक्षा समितीची स्थापना त्यासाठी करण्यात आली. त्यासोबतच संत्रा विक्रीसाठी आपली नियमावली तयार करून त्याच अटी, शर्तींच्या आधारे संत्रा विकणार असल्याचे गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांना ठणकावले. 

शेतकऱ्यांच्या या संघटित क्रांतीचा अपेक्षित परिणाम झाला आणि चमत्कार घडला. शेतकऱ्यांच्या सहा अटी मान्य करीत व्यापाऱ्यांनी खरेदीची तयारी दर्शविली. त्यामध्ये २० किलो क्षमतेच्या क्रेटनेच खरेदी ही महत्त्वपूर्ण अट होती. व्यापाऱ्यांच्या मुजोरीविरोधात आवाज उठविऱ्या या शेतकऱ्यांची माहिती सर्वदूर पसरली. त्याच आधारे गुजरातेतील अहमदाबादच्या प्राइमफ्रेश कंपनीने या भागातून संत्रा खरेदीची तयारी दर्शविली. दिवाळीत कंपनीकडून खरेदी केली जाणार आहे. यामुळे स्पर्धा वाढल्याने दरातील तेजीदेखील संत्रा उत्पादक अनुभवत आहेत. त्यामुळेच आमच्यासाठी हेच लक्ष्मीपूजन ठरले, असेही गावकरी सांगतात. 

शेतकरी संघटित झाले, सामूहिक लढा पुकारला त्यामुळेच हे शक्‍य झाले, अशी भावना या २२ गावांतील शेतकऱ्यांमध्ये रुजली आहे. यापुढील काळात संघटनात्मक आयुधाचा अशाच सकारात्मक कामासाठी वापर करण्यावर त्यांचे एकमत झाले आहे. गावातील काहींनी तर ही त्यांच्यासाठी दिवाळी भेटच ठरल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया
गावकऱ्यांनी सामूहिकपणे व्यापाऱ्यांना विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर व्यापाऱ्यांकडून देखील शेतकऱ्यांचे संघटन पाहता माघार घेण्यात आली. वीस किलो क्षमतेच्या टोमॅटो क्रेटनेच खरेदी आणि इतर सहा निकष मान्य करण्यात आले. त्यामुळे एका अर्थाने आमच्यासाठी लक्ष्मी प्रसन्न होत, हेच लक्ष्मीपूजन ठरले आहे.
- हर्षद काळमेघ, ग्रामस्थ, चौसाळा


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...