agriculture news in marathi, Dnyaneshwar Sugar Factory implements Drip irrigation scheme | Agrowon

ठिबक सिंचनसाठी ‘ज्ञानेश्‍वर’चा पुढाकार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

नगर : ऊसासह बारमाही पिकांसाठी शासन साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन कर्ज योजना राबवत आहे. शासन, साखर कारखाना आणि शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना असेल. पाच वर्षाच्या कालावधीसाठी हेक्‍टरी ८५ हजार ४०० रुपये कर्ज दिले जाणार असून त्या रकमेवर असलेले व्याज चार टक्के राज्य सरकार, तर १.२५ टक्के कारखाना भरेल. शेतकऱ्यांना फक्त व्याजापोटी दोन टक्के रक्कम भरावी लागणार आहे. योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी भेंड्याच्या श्री ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्यांसह जिल्ह्यामधील अन्य कारखाने अग्रेसर आहेत.

नगर : ऊसासह बारमाही पिकांसाठी शासन साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन कर्ज योजना राबवत आहे. शासन, साखर कारखाना आणि शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना असेल. पाच वर्षाच्या कालावधीसाठी हेक्‍टरी ८५ हजार ४०० रुपये कर्ज दिले जाणार असून त्या रकमेवर असलेले व्याज चार टक्के राज्य सरकार, तर १.२५ टक्के कारखाना भरेल. शेतकऱ्यांना फक्त व्याजापोटी दोन टक्के रक्कम भरावी लागणार आहे. योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी भेंड्याच्या श्री ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्यांसह जिल्ह्यामधील अन्य कारखाने अग्रेसर आहेत.

नगर जिल्ह्यासह राज्यातील मागील दोन वर्षांचा कालावधी वगळता मागील साधारण सात ते आठ वर्षे दुष्काळात गेली. एखाद्या भागाचा अपवाद वगळला तर बहुतांश भागात केवळ पिण्याच्या पाणायासाठीच लोकांना सघर्ष करावा लागला. शेतीला तर पाणी मिळाले नाही, त्यामुळे शेती उत्पादनात मोठा फटका सोसावा लागला. उसाचे क्षेत्रही कमी झाले. अशाही परिस्थितीत मात्र ठिंबक सिंचनचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र फारसा फटका बसला नाही. त्यामुळे यंदा ऊस पिकांसह बारमाही पिकांचे क्षेत्र क्षेत्र सूक्ष्म सिंचनखाली आणण्यासाठी शासनाने ठिबक सिंचन कर्ज योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासन, साखर कारखाना आणि शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना आहे. त्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये श्री ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना ठिबक, तुषार सिंचन योजनेसाठी पाच वर्षांच्या मर्यादित हेक्‍टरी ८५ हजार ४०० रुपये कर्ज दिले जाणार आहे. त्यासाठी सव्वा सात टक्के व्याजदर आहे. त्यातील चार टक्के रक्कम शासन, तर सव्वा टक्के साखर कारखाना भरेल. शेतकऱ्यांना फक्त दोन टक्के व्याज भरावा लागेल. पाच हेक्‍टरच्या मर्यादेत एका शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. शेतकऱ्यांनी यातून लाभ घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ज्ञानेश्‍वर साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांनी सांगितले. ज्ञानेश्‍वर कारखाना साधारण साडे तीन हजार हेक्‍टर क्षेत्रावर ठिबक सिंचन करण्याचे नियोजन आहे.

या भागातील क्षेत्रासाठी योजना
शासन राबवत असलेल्या ठिंबक सिंचन कर्ज योजनेतून राज्यातील टेंभू उपसा योजना, भीमा (उजनी), मुळा, निम्नमाना, हतनूर, ऊर्ध्वपूस, कानोळी नाला (नागपूर), अंबोली (सिंधुदुर्ग) या योजनांच्या लाभक्षेत्रातील साखर कारखान्याच्या सभासद, बिगरसभासद आणि उस उत्पादक शेतकऱ्यांना यातून लाभ घेता येणार आहे.

लाभासाठी आवश्‍यक कागदपत्रे

  • सातबारा, आठ अ चा उतारा, ६ ड खाते,
  • सेवा सोसायटीचा ना हरकत दाखला
  • शासन मान्य कंपनीचा ठिंबक सिंचन आराखडा
  • संचाचे कोटेशन (शासन मान्य कंपनी)
  • ऊस नोंद असलेल्या सातबाऱ्यासह दोन जामीनदार
  • इतर बॅंकाच्या कर्जाची माहिती
  • सरकारी तगाई कर्ज माहिती
     

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...