हुमणीच्या भुंगेऱ्यांचे वेळीच करा नियंत्रण

हुमणीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या प्रकाश सापळ्यांच्या माध्यमातून सायंकाळी सात ते साडेनऊ वाजेदरम्यान भुंगेऱ्यांचा नायनाट करणे आवश्‍यक आहे. भविष्यातील होणारे नुकसान अगदी सहज टाळण्याची हीच वेळ आहे. त्यानंतर कितीही प्रयत्न केले, तरी हा प्रादुर्भाव रोखणे अशक्‍य हाईल. - डॉ. एस. बी. पवार, प्रमुख राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद
हुमणीच्या भुंगेऱ्यांचे वेळीच करा नियंत्रण
हुमणीच्या भुंगेऱ्यांचे वेळीच करा नियंत्रण

औरंगाबाद  : नुकतीच पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे हुमणीचे प्रौढ भुंगेरे प्रजननासाठी बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे. त्यांच्‍या नियंत्रणासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांतून मार्गदर्शनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कडुलिंब, बाभळीच्या झाडाखाली अल्प खर्चाचा प्रकाश सापळा, एरंड आंबवण सापळा लावावा, असे आवाहन करण्यात आले. फुलंब्री तालुक्‍यातील बिल्डा येथे बुधवारी (ता. १२) सायंकाळी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, तालुका कृषी अधिकारी मेघा पतंगे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. किशोर झाडे उपस्थित होते. 

एका प्रकाश सापळ्यात अधिकाधिक भुंगेरे अडकून पडून मरून जातात. असे १०० मादी भुंगेरे जर प्रकाश सापळ्यात मारले गेले,  तर एका सापळ्यामुळे मोठ्या प्रमाणात हुमणीची आळी नियंत्रित होते. एका गावात किमान १० शेतकऱ्यांनी सापळे लावले, तरी ५० हजार हुमणी अळ्या नष्ट होऊ शकतात. हे भुंगेरे २० ते २५ जूनपर्यंत दिसतील. या भुंगेऱ्यांचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

...असा करा उपाय शेतातील कडुनिंब, बाभळीच्या झाडाखाली एक बल्ब (विजेचा किंवा चार्जिंग बॅटरीचा) लावा. त्याखाली मोठ्या घमेल्यात किंवा सपाट वाफा बनवून पाणी सोडावे. त्यात रॉकेल मिसळल्यास हुमणी भुंगेरे पडून मरून जातात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com