दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने करा : पालकमंत्री देशमुख

दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने करा : पालकमंत्री देशमुख
दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने करा : पालकमंत्री देशमुख

सोलापूर : जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळाचे स्वरूप गंभीर आहे. दुष्काळात पाणी आणि चाऱ्याची टंचाई भासणार आहे. या परिस्थतीवर मात करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी, चारा उपलब्ध करून देण्यास शासन आणि प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर बैठकीचे आयोजन करावे. या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आदर करून त्यावर त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचना शुक्रवारी (ता. ११) पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिल्या. दर सोमवारी टंचाईची आढावा बैठक व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थती आणि उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, महिला बालकल्याण सभापती रजनी देशमुख, शीला शिवशरण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, ``दुष्काळात जनतेला पाणी, चारा आणि रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. प्रस्तावानुसार पाहणी करून टँकर उपलब्धतेबाबत त्वरित निर्णय घ्यावा. चुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, दुष्काळामुळे जिल्ह्यात भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. पाणी, चाराटंचाईचे गंभीर स्वरूप आहे. मात्र निवारणासाठी निधीची कमतरता नाही. टंचाई काळात चारा डेपो सुरू करण्याबाबत निर्णय घेऊन चारा उपलब्ध केला जाईल.``

रोजगार हमी, मनरेगा अंतर्गत मजुरांसाठी पुरेशी कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. गावातील पाझर तलाव भरण्याबाबत ज्या गावांचे प्रस्ताव येतील ते पालकमंत्री, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जलसंपदा विभागाकडे पाठवले जातील, असे त्यांनी सांगितले.

विंधनविहिरी दुरस्त करा पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केलेल्या स्राेतातून पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत आवश्यकता असल्यास तात्पुरते टँकर सुरू करावेत. पिण्याच्या पाण्याच्या, विंधनविहिरी तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करावा, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com