agriculture news in Marathi do not accept complaint of soybean seed Maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत तक्रारी न घेण्याचे निर्देश !

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करण्याची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. 

अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करण्याची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस आहे. त्यामुळे यापुढे सोयाबीन बियाणे कमी उगवणशक्तीबाबतच्या तक्रारी स्वीकारू नयेत, असे निर्देश जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हा कृषी विभागाने याबाबत शनिवारी (ता.११) संबंधितांना पत्र पाठवले आहे.

यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या, कमी प्रमाणात उगवल्याबाबत याबाबत कृषी खात्याने शेतकऱ्यांकडून तक्रारी मागविल्या होत्या. शेतकऱ्यांनी शेकडोच्या संख्येत तक्रारी केल्या आहेत. यापैकी अनेक तक्रारींची तालुका निवारण समितीने तपासणी केली आहे. सोयाबीन न उगवण्याची कारणे या तपासणीदरम्यान समोर आलेली आहेत. अद्यापही काही तालुक्यात तक्रारींचा ओघ कायम आहे.

मात्र आता जुलैचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार  दुसऱ्या आठवड्यापर्यंतच लागवड करता येते. त्यामुळे आता उगवणशक्तीबाबत तक्रारी स्वीकारू नये, असे पत्र पाठविण्यात आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...