शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू नका

बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त भावाने खते मिळावीत. त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी खतांच्या प्रति बॅग किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. याच किमतीला शेतकऱ्यांना खत विक्री करावी. कुठलाही गैरप्रकार आढळल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांना माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Do not cheat farmers in selling fertilizer

जिल्ह्यात शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. मशागतीची कामेही वेगाने सुरू असून अंतिम टप्यात पोचली आहेत. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त भावाने खते मिळावीत, त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी खतांच्या प्रति बॅग किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. याच किमतीला शेतकऱ्यांना खत विक्री करावी. कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यात कंपनीनिहाय दर जाहीर केले आहेत.

कंपनी ग्रेड दर (रुपयांत)
जीएसएफसी २०.२०.०.१२ ९७५
  १०.२६.२६ ११७५
  १२.३२.१६ ११८५
  डीएपी १२००
कोरोमंडल डीएपी १२५०
  १०.२६.२६ ११८५
स्मार्टटेक २०.२०.०.१३ १०६५
  १०.२६.२६ १२६५
आयपीएल डीएपी १२२५
  एमओपी ९५०
  १६.१६.१६ १०७५
आरसीएफ युरीया २६६.५०
  १५.१५.१५ १०६०
ईफको १०.२६.२६ १२००
  १२.३२.१६ ११८२
  २०.२०.०.१३ ९७५
झुआरी डीएपी १२५५
जीएनव्हीएफसी २०.२०.० ९५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com