agriculture news in marathi Do not close Nampur Market Branch of Nashik District Bank | Agrowon

नाशिक जिल्हा बँकेची नामपूर मार्केट  शाखा बंद करू नका 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

नाशिक : जिल्हा बँकेची नामपूर शाखा बंद करू नका, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रद्वारे केली आहे.  

नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर येथे जिल्हा सहकारी बँकेची गेल्या ३५ वर्षांपासून मार्केट यार्ड शाखा कार्यरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शाखा असल्याने परिसरातील खातेदारांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी सोयीस्कर आहे. ही शाखा ताहाराबाद ते मालेगाव रस्त्यालगत असल्याने ग्रामीण भागातून सोयीस्कर व्यवहार होत असतात. त्याचबरोबर बाजार समितीतील हमाल मापारी यांचे व्यवहारही याच शाखेतून होत असल्याने जिल्हा बँकेची नामपूर शाखा बंद करू नका, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रद्वारे केली आहे. 

जिल्हा बँकेच्या या शाखेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ४० लाखांच्या ठेवी यासह २०० माथाडी कामगारांचे २०० खाते, तर वेअर हाउस खाते आहेत. या शाखेशी संलग्न विविध कार्यकारी सोसायटी ९ संस्था, बिगर शेती पतसंस्था ५ तर मजूर संस्था ९ आहेत. शाखेत १४ गावातील शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे अनुदान व विम्याची रक्कम या शाखेत येत असते. दैनंदिन बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्याचे व्यवहार ह्याच शाखेत होत असतो. नामपूरमधील झेंडा चौक शाखेची जागा ही कमी आहे. त्या शाखेचा विस्तार अधिच मोठा आहे. त्यामुळे व वाहन पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांसाठी पुरेशी नाही. त्यामुळे मार्केट यार्ड शाखा या शाखेत विलीन करू नये, 

ज्या ठिकाणी शाखा कार्यरत तेथे कामकाज नियमित करावे. त्याच ठिकाणी असू द्यावी. हि मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तिचा विचार करावा, नाहीतर रस्त्यावर उतरून अंदोलन करावे लागेल, असा इशारा संघटनेचे उत्तर-महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी दिला. 

‘नाबार्ड’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही 

ज्या शाखा सलग तीन वर्षे तोट्यात आहेत. तसेच नजीकच्या शाखेपासून आठ किलोमीटर अंतराच्या आत आहेत. अशा शाखा बंद कराव्यात, अशा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बँकेचा तोटा वाढत चालल्याने बँकेच्या ऑडिटमध्ये ही बाब समोर आली. त्यामुळे शाखा चालू ठेवण्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात करण्यासाठी ही शाखा बंद करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार ही कार्यवाही सुरू असल्याचे बँकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...