agriculture news in Marathi do not collect toll from farmers Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांकडून टोल वसुली नको : राज्य कृषी विभाग करणार केंद्राला विनंती

सुर्यकांत नेटके
सोमवार, 27 एप्रिल 2020

शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाला, दूध यासह कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली करू नये असा नियम आहे. मात्र तरीही टोल वसुली होत असेल तर बाब गंभीर आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे टोल वसुलीबाबत मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बोलणार आहे. टोल वसुली होऊच नये. होत असेल तर ती तातडीने थांबली पाहिजे. 
- डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री 

नगर : कोरोनासारख्या गंभीर संकटातही अत्यावश्यक सेवा देताना शेतकरी कसरत आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहनाकडून टोल वसुलीला नकोच आहे. मात्र टोलवसुलीचा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या शेतकऱ्यांच्या वाहनांकडून टोलवसुली न करण्याबाबत राज्य सरकारचा कृषी विभाग विनंती करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तर, शेतकऱ्यांकडून टोल वसुली थांबण्याबाबत शक्य त्या बाबी करणार असल्याचे पणन व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. 

याविषयी बोलताना कृषिमंत्री भुसे म्हणाले,‘‘शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. शेतमाल विक्रीची साखळी भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहोत. अडचणीवर मात करून शेतकरी शेतमाल विक्री करत आहेत. शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या वाहनाकडून टोल वसुली नकोच आहे. मात्र हा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहनांकडून लॉकडाऊनच्या काळात टोल वसुली करू नये याबाबत केंद्र सरकारला राज्याचा कृषी विभाग विनंती करणार आहे.’’ 

पणनमंत्री पाटील म्हणाले,‘‘सध्याच्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांना मदत करण्याच्या भूमिकेतून सरकार काम करत आहे. कठीण प्रसंगातून शेतकरी जात असताना शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाला, शेतमाल, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल घेतला जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. याबाबतची माहिती घेऊन लॉकडाऊनच्या काळात टोलवसुली कशी बंद होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे.’’ 

माजी माजी पणन व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले,‘‘सध्याच्या संकटकाळात प्रशासन काम करतेय, तसेच काम अत्यावश्यक सेवा देण्यासाठी शेतकरी करत आहेत. सध्याच्या काळात भाजीपाला, दूध, फळे, कडधान्य, अन्नधान्य या अत्यावश्यक गरजेच्या बाबी आहेत. या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून अजिबात टोल वसुली होऊ नये.

कारण ही वेळ नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे अत्यावश्यक वस्तू जर सगळ्यापर्यंत पोचवायच्या असतील तर खर्च कमी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सिस्टिम ठरवून देणे महत्त्वाचे आहे. अत्यावश्यक सेवेतील किमतीत साधारण तीस ते चाळीस टक्के वाढ होते. त्यात ग्राहक व शेतकरी मरतो आहे. त्याला टोलसारख्या बाबी कारणीभूत आहे. त्यामुळे टोलवसुली नको आहे.’’ 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी बोलणार 
शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाला, दूध यासह कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली करू नये असा नियम आहे. मात्र तरीही टोल वसुली होत असेल तर बाब गंभीर आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्यांना आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे टोल वसुलीबाबत मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बोलणार आहे. टोल वसुली होऊच नये. होत असेल तर ती तातडीने थांबली पाहिजे. 
- डॉ. अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...