Agriculture news in marathi Do not deposit crop insurance in debt, demand 'swabhimani' | Page 2 ||| Agrowon

पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू नका, ‘स्वाभिमानी’ची मागणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा न करता शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा न करता शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी याबाबत कृषीमंत्री भुसे यांच्याकडे निवेदन पाठविले. 

डिक्कर यांनी म्हटले की, जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातही २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे पूर्ण व्यवहार ठप्प आहेत. पंरतु या संकटात शेतकरी आणि शेतमजूरांना दिनचर्या कशी चालवावी, हा प्रश्‍न पडला आहे.

मागील वर्षी ओल्या दुष्काळाने १०० टक्के पिकांची नासाडी झाली. त्यामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचा विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला. पंरतु, ‘कोरोना’मुळे बँका मात्र पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना न देता कर्जखात्यांत जमा करीत आहेत. 

काहींचे कर्ज खाते निल झाले आहे, काहींचे व्हायचे आहे. शासनाकडून ही रक्कम दिली जाणारच आहे. त्यामुळे बँकांनी पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करणे योग्य नाही. शेतकऱ्यांजवळ सद्यस्थितीत पीकविम्याशिवाय दुसरा कुठलाही पैसा नाही. त्यामुळे खरिपाचा पीकविमा कर्जखात्यांत जमा न करता थेट शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी डिक्कर यांनी निवेदनाद्वारे केली.


इतर ताज्या घडामोडी
अकोला जिल्हा परिषदेला जमीन...अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची...
सात तालुक्‍यांतील अनुदान थकलेल्या...नगर ः पशुधन जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या...
सांगलीत दोन हजार क्विंटल कापूस...सलगरे, जि. सांगली ः कापसाला शेजारच्या कर्नाटक...
मुंबई बाजार समितीतील २३ अधिकारी,...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
बीबीएफ टोकण यंत्राने करा पेरणीरुंद वरंबा सरी पध्दतीचा प्रमुख उद्देश म्हणजे...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...