जत तालुक्याला पाण्याचे दान नको, हक्काचा वाटा द्या

जत तालुक्याला पाण्याचे दान नको, हक्काचा वाटा द्या
जत तालुक्याला पाण्याचे दान नको, हक्काचा वाटा द्या

सांगली ः जत तालुक्यात म्हैसाळचे पाणी सोडण्यास अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. जत तालुक्‍याच्या हक्काचे पाणी जतला सोडायला पाहिजे, पण तसे न करता अधिकाऱ्यांनी भोंगळ कारभार सुरू केला आहे. त्यांना वाटेल तिथे पाणी सोडले जाते आहे. म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी जत तालुक्यावर पहिल्यापासूनच पाणी सोडण्याबाबत दुजाभाव करत आहेत. पाण्याचा प्रवाह कमी केल्याने जतला वेगाने पाणी येत नाही. पण तेच पाणी कर्नाटकात कसे वाहून जाते असा खडा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. म्हैसाळचे आवर्तन सुरू झाले की जत तालुक्यात शेवटी पाणी मिळते. तोपर्यंत आवर्तन बंद झालेले असते. वास्तविक पाहता पाणी नियोजन शेवटच्या भागाला पहिल्यांदा मग सुरवातीला असा नियम आहे. परंतु या योजनेचे पाणी लाभ क्षेत्रातील पहिल्या गावाला अगोदर मिळते मग शेवटच्या गावाला मिळते. अर्थात, शेवटच्या गावापर्यंत पाण्याचा विसर्ग कमी झालेला असतो.

जतला हक्काचे पाणी सोडले जात नाही. सध्या या योजनचे काम अनेक ठिकाणी पूर्ण झाले आहे. त्या भागातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी पैसे भरले आहेत. मात्र त्यांना पाणी दिले जात नाही. जत तालुक्‍यासाठी हक्काचे पाणी द्या, अशी साद जतकरांनी घातली आहे. 

जतला पाणी सोडायचे म्हटले, की कमी क्‍युसेकने पाणी सोडण्यात येते. जर योजनेतून  २०० क्‍युसेकने पाणी सोडले तर पाणी तालुक्यात येऊ शकत नाही. याची पूर्ण कल्पना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना असून देखील अधिकाऱ्यांनी ४० ते ५० क्‍युसेक वेगाने पाणी सोडण्यात येते. ज्या ठिकाणी पाणी चोरी केली जाते याची माहिती देखील अधिकाऱ्यांना असते. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढे येत नाहीत. 

अन्यथा, तीव्र आंदोलन पहिल्या टप्प्यात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पिकांची लागवड केली. यामध्ये ऊस, मका, चारा अशी पिके आहेत. पाण्याचे नियोजन बिघडल्याने लाखो रुपये खर्चून केलेली पिकांची लागवड वाया गेली आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com